Jump to content

भणगे दत्त मंदिर (फलटण)

श्री चंद्रशेखर भणगे जागृत दत्त मंदिर महाराष्ट्राच्या फलटण शहरातील मंदिर आहे.

येथे प. पू . श्री गोंदवलेकर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली एकमुखी षडभुज मूर्ती आहे.

सदरची दत्त मूर्ती आणि दत्त मंदिर शके १८३४, २९ एप्रिल १९१२ रोजी स्थापन करण्यात आलेले आहे. दत्त मूर्ती गंडकी शिळेची, सहा हात, एक मुखी असून आजही जागृत दत्तमंदिर म्हणून ओळखले जाते.

स्थापना

शंकर मार्केट समोरील भणगे वाडा होता. या वाड्यात प्रत्येकी ५ ते ७ खणी ९ खोल्या होत्या. व शेजारी मोकळी जागा होती. सदरचा वाडा संपूर्ण लाकडी व टोपण माचीचा असून बांधकाम घाणीच्या चुन्यातून केलेले होते. 

सखाराम जगन्नाथ भणगे हे फलटण येथील निंबाळकर संस्थान यांचे खाजगी कारभारी होते व व्यवसायाने ते डॉक्टर होते. त्यावेळी राममंदिराचे बांधकाम सुरू होते. राममंदिराशेजारी दत्तमंदिर बांधण्यात आले. त्यासाठी राजेसाहेबांनी दत्तमूर्ती आणण्यासाठी सखाराम जगन्नाथ भणगे ह्याना पाठविले होते. त्यांनी काळ्या पाषाणाची गंडकी शिळेची एक मुखी सहा हात असलेली दत्ताची मूर्ती आणली होती पण ती राजेसाहेबांना पसंत पडली नाही. नंतर दुसरी मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आणून दिली. या मूर्तीची स्थापना राम मंदिराच्या उत्तर बाजूस करण्यात आली. परंतु सखाराम जगन्नाथ भणगे यांनी आणलेली काळ्या पाषाणाची मूर्ती राजेसाहेबांनी जबरेश्वर मंदिराच्या कोनाड्यात ठेवली होती. सखाराम जगन्नाथ भणगे दत्तभक्त होते. त्यांनी आणलेली काळ्या पाषाणाची मूर्ती बेवारशी ठेवणे व अन्य ठिकाणी ठेवणे योग्य वाटेना म्हणून त्यांनी श्रीमंत राजेसाहेबांना स्वतःच्या वाड्याशेजारी स्वखर्चाने मूर्तीची स्थापना करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. ती राजेसाहेबांनी तात्काळ मान्य  केली.

सखाराम जगन्नाथ भणगे यांना बापू म्हणत असत. त्यांनी वाड्याशेजारी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मंदिराचे बांधकाम करून सदर मूर्तीची स्थापना श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज याचे हस्ते केली. तेच हल्लीचे भणगे यांचे खाजगी एक मुखी सहा हात असलेले जागृत दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध आहेे. या प्रमाणे सखारामपंत त्यानंतर त्यांचा मुलगा दत्तात्रय व दत्तात्रयाचे बंधू धोंडोपंत आणि दत्तात्रायांचा मुलगा विनायक हे अव्याहतपणे पूजाअर्चा करीत होते. धोंडोपंताना मुलगा नसलेने त्यांचे डिसेंबर १९७९ साली  निधन झाले. 

त्यानंतर या मंदिराची संपूर्ण जबाबदारी विनायक दत्तात्रय भणगे यांचेवर आली. त्यानंतर या मंदिराची पूजा अर्चा सण व समारंभाची संपूर्ण चंद्रशेखर विनायक भणगे यांचेवर आली. 

चंद्रशेखर विनायक भणगे, हे त्यांची मुंज झाल्यापासून आजतागायत श्री दत्तात्रेयांची सेवा करीत आहे. १९७४ साली १० वीत असताना श्री गुरुदेव दत्तात्रायांच्या आज्ञेनुसार त्यांचे वेद अध्ययन फलटण येथील वेदशास्त्र संपन्न कै. श्री तात्या वादे याचेकडे झाले मी वैदिक कर्मान बरोबर वास्तुशांत, मुंज, पवमान पूजाअर्चा सर्व काही त्याचेकडून शिकून घेतले व त्यामुळेच ते श्री गुरूंची अधिक चांगली सेवा करू शकले

मंदिरामध्ये ऋतुमानानुसार विविध कार्यक्रम  होत असतात. त्यात प्रामुख्याने श्रावण महिन्यात अभिषेक, कार्तिक  महिन्यात काकड आरती महिनाभर असते. कार्तिकस्नान समाप्तीचे दिवशी म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला महाप्रसाद वाटप केला जातो. मार्गशीर्षामध्ये गुरुचरित्र पारायण, सात दिवस महाभिषेक, दत्त जन्माचेे दिवशी रुद्राभिषेक, पवमान अभिषेक, महिम्न अभिषेक, आणि सायं काळीं जन्मकाळ दुसरे दिवशी महाप्रसाद वाटप केला जातो. दत्तभक्तांची सतत रीघ असतेच.

दत्तमंदिराची स्थापना होऊन आजमिती १०० वर्षे होऊन गेलेली आहेत. आज पर्यंत अनेक भक्तांच्या मनोकामना श्रीनी पूर्ण केलेल्या आहेत असे भक्तगण आवर्जून सांगतात. पुनः पुनः गुरू माऊलींचे दर्शनास येतात. 

सी व्ही भणगे,

शंकर मार्केट समोर भणगे दत्तमंदिर,

फलटण, जिल्हा सातारा, पिन कोड ४१५५२३. 

नामधारक भक्ताय निर्वीण्णाय  व्यदर्शयेत ।

तुष्टा स्तुत्या स्वरुपंच श्रीदत्त शरणं मम्  ।।