भटिंडा
बठिंडा ਬਠਿੰਡਾ | |
भारतामधील शहर | |
येथील किला मुबारक | |
बठिंडा | |
देश | भारत |
राज्य | पंजाब |
जिल्हा | बठिंडा जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६९० फूट (२१० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,८५,७८८ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
बठिंडा (पंजाबी: ਮਾਨਸਾ; जुने नाव: भटिंडा) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक प्रमुख शहर व बठिंडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बठिंडा शहर पंजाबच्या दक्षिण भागात राजधानी चंदिगढच्या २२५ किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली बठिंडाची लोकसंख्या २.८५ लाख होती.
पंजाबच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेले बठिंडा सध्या ह्या भागातील मोठे वाहतूककेंद्र आहे. बठिंडा रेल्वे स्थानक पंजाबमधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे ६ मार्ग जुळतात. बठिंडामध्ये भारतीय लष्कराचा मोठा तळ आहे.