Jump to content

भटके कलावंत आणि भिक्षेकरी

एके जागी स्थिर न राहता सतत भटकत राहणारे काही भटके कलावंत आणि भिक्षेकरी महाराष्ट्रात पिढ्यान्‌ पिढ्या राहत आले आहेत. त्यांपैकी काही असे :

  • उदासी : या पंथाचे लोक भिक्षेवर जगतात.
  • कडकलक्ष्मी :
  • काथोडी : आदिवासींमधील एक जमात
  • कानफाटे : हे नाथपंथीय असतात.
  • कुडमुडे जोशी : गळ्यात उपरणे घालून डोईस रुमाल बांधून, कपाळाला गंध लावलेले हे स्वच्छ कपड्यातले भिक्षेकरी वर्षभविष्य सांगत गावोगाव फिरतात.
  • कुर्मुडा : हे भिक्षेकरी पहाटे भिक्षा मागायचे, गाणी गायचे, भविष्यवाणी करायचे. हे भिक्षा स्त्रीच्या हातूनच घेत असत. भिक्षा म्हणून ज्वारी, तुरीची डाळ, किंवा १-२ रुपये घेत. त्यांच्या हातात एक काठी, डमरू, खंद्यावर घोंगडी व तोंडात सुमधूर गाणी असायची.
  • कैकाडी : बुरुडांप्रमाणेच हे टोपल्या बनवतात. पण त्यासाठी करंज्याच्या बारीक फांद्या किंवा तरवड्याच्या ओल्या फांद्या वापरतात. घायपातापासून दोर बमवून विकतात.
  • कोल्हाटी : रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे.
  • गारुडी : हे साप, अजगर आणि नाग पकडतात आणि त्यांचे गावोगाव खेळ करतात.
  • गोंधळी : हे बिनबोलावता येत नाहीत. अनेकजण घरात लग्नमुंजीसारखा मंगल प्रसंग होऊन गेल्यावर यांना देवीच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावले जाते.
  • गोसावी : या पंथातले लोक दानधर्मावर जगतात. यांना स्वतःचा खास असा काही व्यवसाय नसतो. उत्तरी भारतात यांचे मठ आणि आखाडे असतात. कुंभमेळ्याला यांची हमखास हजेरी असते.
  • जोगतिणी : या यल्लम्मा देवीला वाहिलेल्या स्त्रिया डोक्यावर देवघरात ठेवलेली देवीची मूर्ती किंवा छायाचित्र घेऊन गावोगाव आणि रस्तोरस्ती फिरत फिरत दान मिळवतात.
  • जोगी
  • डवऱ्या गोसावी
  • डोंबारी : कोल्हाट्याप्रमाणे रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी माणसे. कोल्हाट्यांनाच प्रामुख्याने कर्नाटकात डोंबारी म्हणतात.
  • तेलंगी ब्राम्हण : हे ब्राह्मण घरोघर हिंडून घनपाठ, जटापाठ आदी स्वरूपातले वेद म्हणतात, भविष्य सांगतात आणि त्याप्रीत्यर्थ मिळालेले दान स्वीकारतात.
  • दरवेशी : गावोगावी जाऊन अस्वलाचे खेळ करणारा. हे अस्वलाला नाचवतात, त्याच्याशी कुस्ती खेळतात आणि त्याचे केस मुलांच्या गळ्यातल्या ताइतासाठी आयाबायांना विकतात.
  • नंदीबैलवाला
  • पांगुळ : स्वतःला सूर्याचा पांगळा सारथी अरुण याचे वंशज मानण्या‍ऱ्या भिकाऱ्यांची एक जात.
  • फकीर : मुसलमान भटके भिक्षेकरी.
  • फांसेपारधी : डुकरे, ससे, हरणे, पाखरे असे शेतीला त्रासदायक असणारे पशुपक्षी, हे फासे लावून पकडतात.
  • बहुरूपी : बहुरूपी रोज एक सोंग घेऊन गावात येतो. कधी पोलीस, कधी इंग्लिशमन तर कधी जख्ख म्हातारा. गर्भार बाईचे सोंग देखील आणणारे हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतात.
  • बाळसंतोष : मयूरपिच्छांनी मढलेले असतात.
  • बुरूड : बांबूच्या टोपल्या विणणारी माणसे. हे फक्त बांबूकाम आणि वेतकाम करतात. बांबू किंवा वेत वाकवून त्याच्या पातळ पट्ट्या किंवा कामट्या करून हे वस्तू बनवतात. बांबूच्या टोपल्या, दुरड्या, बुरकुल्या, शेल्फ व उदबत्तीच्या काड्या, आणि वेताच्या खुर्च्या बनवणारे बव्हंशी बुरूडच असतात. प्रत्येक शहरात एखादी बुरूडआळी असते, तिथे यांची वस्ती असते. एरवी हे गावागावातून भटकत आपला व्यवसाय करतात.
  • बैरागी : तोंडाला राख फासलेली हातात कमंडलू घेऊन भिक्षा मागणारे.
  • भराडी
  • भुत्या : देवीचे हे भक्त गावोगाव फिरत दान मिळवतात.
  • मांगगारुडी : हे म्हशी भादरायचे काम करतात.
  • रामदासी: ही माणसे गावोगाव आणि शहरातील घरोघरी फिरून रामदासांच्या काव्यरचना ऐकवून दान मिळवतात. यांचे मुख्यालय सज्जनगडावर आहे.
  • लमाण : बैलावरून सामानाची वाहतूक करणारी भटकी जमात.
  • वंजारी : लमाणांसारखेच काम करणारी माणसे.
  • वडारी : गाढवावरून, माती, विटा आदींची वाहतूक करणारे आणि बाधकामात मजुरी करणारे.गावोगाव एखादी वडारवाडी असते.
  • वाघ्ये आणि मुरळ्या : हे जेजुरीच्या खंडोबाचे भक्त गावोगाव फिरून खेडुतांच्या कपाळाला भंडारा फासतात, त्यांना जेजुरीच्या खंडोबाची आण घालतात, आणि खंडोबाची गाणी म्हणत भिक्षा मागतात.
  • वासुदेव : अगदी पहाटे पहाटे कृष्णभक्तीची गाणी ऐकवून लोकांना झोपेतून उठवणारा गुणवान भिक्षेकरी.
  • वैदू : कंदमुळे आणि झाडपाल्याची औषधे विकणारे भटके वैद्य.