Jump to content

भटकळवाडी

  ?भटकळवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव (वाडी)  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
७.०२ चौ. किमी
• ६१९ मी
जवळचे शहरनारायणगाव,जुन्नर.
जिल्हापुणे जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,५४८ (२०११)
• ३६३/किमी
भाषामराठी
बोलीभाषामराठी
कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +०२१३२
• एमएच/१४

भटकळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव (वाडी) आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८० मिमी पर्यंत असते. हा भाग पर्जन्य छायेत येतो. पाऊस साधारणतः जुलै महिन्यात चांगला पडतो.

लोकजीवन

येथील लोक मुख्यतः शेती व दुग्धव्यवसाय करतात. येथे मुख्य आडनावे व पूर्वीपासूनचे रहिवासी काकडे, लेंडे, काचळे, बाम्हणे, वाजे ह्यांची लोकसंख्या जास्त असून भटकळ आडनावाचे मोजकेच लोक राहतात. स्थानिक राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे 2 पक्ष आहेत, उत्तरेला कुकडी डावा कालवा व पश्चिम दिशेला कुकडी नदी यामुळे हा विभाग लाभ क्षेत्रात येतो. जमीन रेगुर प्रकारची आहे, मुख्य पिके ऊस, गहू ही आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

परिनाथ बाबा मंदिर, विठ्ठल रुक्मिणी, राम मंदिर, मारुती मंदिर कानिफनाथ मंदिर (लेंडे मळा) मांगीरबाबा मंदिर.(खालचा लेंडेमळा) सत्यनारायण मंदिर (रासकरवाडी) गणेश मंदिर(बाम्हणेमळा) कुकडी नदी बंधारा

=नागरी सुविधा

प्राथमिक शाळा

जवळपासची गावे

बोरी, आळे गाव, आळेफाटा, वडगाव कांदळी,ही गावे भटकळवाडीच्या सीमेला लागून आहेत.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate