भंडारा रोड रेल्वे स्थानक
भंडारा रोड दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | वरठी, भंडारा जिल्हा |
गुणक | 21°14′18″N 79°38′45″E / 21.23833°N 79.64583°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २६५ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | BRD |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
भंडारा रोड |
भंडारा रोड हे भारत देशाच्या भंडारा शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. हे भंडाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे. या स्थानकाजवळील गावाचे नाव वरठी आहे.मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक हे भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.
भंडारामार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस