Jump to content

भंडारा

  ?भंडारा
भानारा
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पितळाचे शहर
—  शहर  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
Map

२१° १०′ ००″ N, ७९° ३९′ ००″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१६.८ चौ. किमी
• २४४ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• १,२५३ मिमी (४९.३ इंच)
२७.१ °C (८१ °F)
• ४६.२ °C (११५ °F)
• ८ °C (४६ °F)
जवळचे शहरभंडारा
प्रांतविदर्भ
विभागनागपूर
जिल्हाभंडारा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
९१,८४५ (२०११)
• ५,४६७/किमी
९३८ /
९१.९५ %
• ९४.५८ %
• ८९.२८ %
भाषामराठी , हिन्दी
नगराध्यक्षसुनील मेंढे
उपनगराध्यक्षआशिष गोंडाने
संसदीय मतदारसंघभंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघभंडारा
नगर परिषदभंडारा नगर परिषद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४४१९०४
• +९१७१८४
• महा-३६

भंडारा शहर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.

शहराची माहिती

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या भंडारा शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणाऱ्या पुरामुळे शहराला चहूबाजूंनी प्रोटेक्शन भिंतींनी घेरले आहे.भंडारा जिल्हात महासमाधी भूमी , कोरंभी मंदिर असे अनेक स्थळे बघण्यासारखे आहेत

हवामान

भंडाऱ्याचे तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सियस आणि हिवाळ्यात कमीत-कमी ८ अंश सेल्सियस तापमान असते..

भंडारा साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) २७.६ ३१.१ ३५.२ ३९.० ४२.१ ३८.१ ३०.५ २९.९ ३०.८ ३१.० २९.३ २७.९
सरासरी किमान °से (°फॅ) १३.३ १५.४ १९.६ २४.६ २८.९ २७.४ २४.३ २४.१ २३.९ २१.२ १५.२ १२.९
सरासरी वर्षाव मिमी (इंच) ११.९ ३४.८ १७.० १७.३ १५.५ २१५.१ ४१३.३ ३८७.९ २०७.३ ४४.५ १५.५ ८.१
स्रोत: Government of Maharashtra[मृत दुवा]

लोकसंख्याशास्त्र

भंडार्यातील धर्म
धर्मटक्के
हिंदु
  
77.23%
मुस्लिम
  
10.85%
ख्रिस्ती
  
0.35%
बौद्ध
  
10.54%
शिख
  
0.18%
जैन
  
0.30%
इतर
  
0.37%
नाही दर्शविले
  
0.18%

२०११साली झालेलया जनगणनेमध्ये, भंडारा शहराची लोकसंख्या ११,९८,८१० होती. त्यांत पुरुष ५१% व महिला ४९% होत्या. भंडारा येथे सरासरी साक्षरता दर ८०% आहे हा. ७४.०४% या राष्ट्रीय सरासरी पेक्षा किंचित जास्त आहे. शहरातील ८५% पुरुष आणि ७५% स्त्रिया साक्षर आहेत. भंडारा शहरात ६ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११% आहे.

सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत त्यात ५.६५ % इतकी वाढ झाली आहे.[]

उद्योग

अशोक लेलॅंड (जड वाहन निर्माता), सनफ्लॅग (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, एलोरा पेपर मिल आणि मॅंगेनिझ माती खाणी येथे आहेत. व्हिडीओकॉन इंटरनॅशनलचा इलेक्ट्रॉनिक्स हा प्रस्तावित कारखाना भंडाराशहरा जवळच होणार आहे. (२०१७ची स्थिती). शहरामधून एक रेल्वे लाईन जाते, ती पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा सनफ्लॅग या उद्योगांसाठी वापरली जात होती.

ऐतिहासिक आकर्षणे

भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो.

बहिरंगेश्वर मंदिर हे अजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरातीचा उत्सव होतो. त्यावेळी तेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन असल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खांब आहे. हा खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते.

भंडारा शहरात एक शंभर वर्षापेक्षा जुने सार्वजनिक वाचनालय आहे.

इतर आकर्षणे

गांधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते.

विविध शहरांची भंडाऱ्यापासूनची किलोमीटरमध्ये अंतरे

शहरमुंबईकलकत्तादिल्लीबंगलोरहैदराबादचेन्नईरायपूरजबलपूरभोपाळपुणेनागपूरविशाखापट्टनमभुवनेश्वर
अंतर९१९१०६३१२५६११९०५९५११००१९९२५४५३२१०००६२६५६८४४

संदर्भ

  1. ^ "District Census 2011 जिल्हानिहाय जनगणना". २९ नोव्हेंबर, इ.स. २०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - (इंग्रजी मजकूर)

हे सुद्धा पहा