ब्लॅक पँथर पार्टी
'ब्लॅक पॅंथर पार्टी
स्थापना
ब्लॅक पॅंथर पार्टी
'ब्लॅक पॅंथर पार्टी'हि अमेरिकेतील काळ्या क्रान्तीकारी समाजवाद्यांनी स्थापन केलेली आणि १९६६ ते १९८२ या कालखंडात कृतीशील असणारी संघटना होती.हि संघटना, प्रामुख्याने स्व-संरक्षण या हेतुने स्थापन करण्यात आलेली होती.'ब्लॅक पॅंथरने काळ्यांच्या नागरी हक्कांकरिता अमेरिकेत लढा उभारला. ब्लॅक पॅंथर म्हणजे, प्रस्थापित संस्कृतीला शह देणारी व प्रतिसंस्कृती उभारनारी संघटना अशी पॅंथरची प्रतीमा जगासमोर निर्माण झाली. ब्लॅक पॅंथरची कार्यपद्धती आणि भूमिका या भोवती,६० ते ७० च्या दशकात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक चर्चा,वादविवाद होताना दिसतात. 'काळा राष्ट्रवाद' या संकल्पनेचा संघटनेने सुरुवातीच्या काळात पुरस्कार केलेला असला तरी नंतरच्या टप्प्यावर ब्लॅक पॅंथरने आपली भूमिका बदलली.'काळा राष्ट्रवाद' स्विकारने म्हणजे एकप्रकारे, वर्णद्वेषचं पुरस्कृत करण्यासारखे आहे,असे म्हणत संघटनेने,समाजवादी क्रान्तीवर्(अशी क्रान्ती जिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव,वर्णद्वेष याला स्थान नसेल) अधिक भर दिला.
भूमिका
काळ्या वर्णसमाजाकरिता आरोग्य सुधारणा,दारिद्र्यनिर्मुलन यासारखे कृती-कार्यक्रम राबवून आणि सुरुवातीची कडवी भूमिका बाजूला सारत, पॅंथर मवाळ स्वरूपात पुढे आली.