ब्रिस्बेन
ब्रिस्बेन Brisbane | |
ऑस्ट्रेलियामधील शहर | |
ब्रिस्बेन | |
देश | ऑस्ट्रेलिया |
राज्य | क्वीन्सलंड |
स्थापना वर्ष | इ.स. १८२४ |
क्षेत्रफळ | ५,९५० चौ. किमी (२,३०० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २१,४६,५७७ |
- घनता | ३४६ /चौ. किमी (९०० /चौ. मैल) |
ब्रिस्बेन (इंग्लिश: Brisbane) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुमारे २१ लाख लोकसंख्येचे ब्रिस्बेन सिडनी व मेलबर्न खालोखाल ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
इ.स. १८२४ साली वसवले गेलेल्या ब्रिस्बेनला येथील ब्रिस्बेन नदीचे नाव देण्यात आले आहे. सध्या ब्रिस्बेन एक जागतिक शहर असून १९८२ राष्ट्रकुल खेळ येथे भरवले गेले होते. येथील गॅबा हे क्रिकेट मैदान जगप्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे
- नगर परिषद
- पर्यटन
- विकिव्हॉयेज वरील ब्रिस्बेन पर्यटन गाईड (इंग्रजी)