Jump to content

ब्रिटिश सोमालीलँड

ब्रिटिश सोमालीलॅंड
धूल्का ब्रिटिशका ई सोमालिया
الصومال البريطاني

१८८४१९६०
ध्वजचिन्ह
राजधानीहारगेइसा
अधिकृत भाषाइंग्लिश, सोमाली
धर्मइस्लाम
राष्ट्रीय चलनइस्ट आफ्रिकन शिल्लिंग्ज

ब्रिटिश सोमालीलॅंड (सोमाली: Dhulka Biritishka ee Soomaaliya ; अरबी: الصومال البريطاني , अल-सुमाल अल-ब्रितानीय; इंग्लिश: British Somaliland) हे वर्तमान सोमालियाच्या उत्तरेकडील भूप्रदेश व्यापणारे ब्रिटिश संरक्षित राज्य होते. हे इ.स. १८८४ ते इ.स. १९६० या कालखंडात अस्तित्वात होते. अस्तित्वकाळातल्या बह्वंशी कालखंडात हे राज्य फ्रेंच सोमालीलॅंड, इथिओपिया व इटालियन सोमालीलॅंड या राज्यांनी वेढला होता. इ.स. १९४०-४१ या कालावधीत इटालियनांनी यावर कब्जा मिळवून आपल्या इटालियन पूर्व आफ्रिका या वसाहतीस जोडला. १ जुलै, इ.स. १९६० रोजी हे संरक्षित राज्य स्वतंत्र होऊन अल्पावधीसाठी सोमालीलॅंडचे राज्य या नावाने अस्तित्वात आले. त्यानंतर आठवड्याभरातच सोमालीलॅंडच्या राज्याचे सोमालियाच्या विश्वस्त राज्याशी (भूतपूर्व इटालियन सोमालीलॅंड) एकत्रीकरण करून सोमाली प्रजासत्ताक स्थापण्यात आले.