Jump to content

ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कॉर्पोरेशन

ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कंपनी ही एक ब्रिटिश विमानवाहतूक कंपनी होती. हिची रचना १९३९मध्ये इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्या एकत्र होऊन झाली. १९७४मध्ये ब्रिटिश युरोपियन एअरवेज ही कंपनी यात विलीन होऊन ब्रिटिश एअरवेजची रचना झाली.

इतिहास

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंपिरियल एअरवेज आणि ब्रिटिश एअरवेज लिमिटेड या दोन कंपन्यांनी सुरक्षेसाठी आपले तळ लंडनमधून ब्रिस्टॉल येथे हलवले व त्याचवेळी एकत्र धंदा करण्याचा करार केला. युनायटेड किंग्डमच्या संसदेने २४ नोव्हेंबर, इ.स. १९३९ रोजी एक कायदा पारित केला आणि त्यावेळी वेगवेगळ्या असलेल्या या दोन कंपन्यांना एकत्र करून ब्रिटिश ओव्हरसीझ एअरवेज कंपनीची निर्मिती केली व तिला राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीचा दर्जा दिला. युद्धादरम्यान लांब पल्ल्याच्या विमानांची कमतरता असूनही या कंपनीने युनायटेड किंग्डमच्या जगभर पसरलेल्या वसाहती आणि अक्ष राष्ट्रांत सामील नसलेल्या देशांशी वाहतूक सुरूच ठेवली होती. आपल्या हयातीदरम्यान या कंपनीने ४० पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांचा वापर केला.

हे सुद्धा पहा