ब्रिटिश एरवेझ (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेझची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेझचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
विमानांचा ताफा
२०२३ च्या शेवटी ब्रिटिश एरवेझकडे २४० विमाने असून अधिक ५३ विमानांची खरेदी होत आहे.
विमान
वापरात
ऑर्डर
एरबस ए३१९-१००
२७
—
एरबस ए३२०-२००
५६
-
एरबस ए३२०निओ
१
१३
एरबस ए३२१-२००
१
—
एरबस ए३२१निओ
११
९
एरबस ए३५०-१०००
१६
२
एरबस ए३८०-८००
१२
-
बोईंग ७७७-२००ईआर
४२
—
बोईंग ७७७-३००ईआर
१६
-
बोईंग ७७७-९
-
१८
बोईंग ७८७-८
१२
-
बोईंग ७८७-९
१८
-
बोईंग ७८७-१०
७
११
एकूण
२४०
५३
देश व शहरे
सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेझ ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. २०२३ च्या शेवटी ही कंपनी जगभरातील ७० देशांमधील १७० शहरांना विमानसेवा देते. यात ७ देशांतर्गत आणि २७ अमेरिकेतील शहरे आहेत.[१]