ब्रह्मपुत्रा नदी
ब्रह्मपुत्रा | |
---|---|
आसामच्या गोहत्ती शहराजवळील ब्रह्मपुत्राचे पात्र | |
ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | तिबेट 30°23′N 82°0′E / 30.383°N 82.000°E |
मुख | गंगा त्रिभुज प्रदेश, बंगालचा उपसागर 25°13′24″N 89°41′41″E / 25.22333°N 89.69472°E |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चीन भारत बांगलादेश |
लांबी | २,९०० किमी (१,८०० मैल) |
उगम स्थान उंची | ५,२१० मी (१७,०९० फूट) |
सरासरी प्रवाह | १९,३०० घन मी/से (६,८०,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६,५१,३३४ |
ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते.
ब्रह्मदेवाचा पुत्र असे ब्रह्मपुत्रा नदीचे नाव पडले असून हिचे नाव काहीजण ब्रह्मपुत्र असे पुल्लिंगी असल्याचे समजतात. (मोठ्या नद्यांना मराठीत नद असा पुल्लिंगी शब्द आहे.) आसाम राज्यामधील बहुतेक सर्व मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावरच वसली आहेत.