Jump to content

ब्रसेल्स

ब्रुसेल्स
Bruxelles (फ्रेंच)
Brussel (डच)
Brüssel (जर्मन)
बेल्जियम देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
= ब्रुसेल्स शहराचे महानगर क्षेत्रामधील स्थान
ब्रुसेल्स is located in बेल्जियम
ब्रुसेल्स
ब्रुसेल्स
ब्रुसेल्सचे बेल्जियममधील स्थान

गुणक: 50°51′0″N 4°21′0″E / 50.85000°N 4.35000°E / 50.85000; 4.35000

देशबेल्जियम ध्वज बेल्जियम
स्थापना वर्ष इ.स. ९४९
क्षेत्रफळ १६१.४ चौ. किमी (६२.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३ फूट (१३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ११,२५,७२८ (३१ डिसेंबर २०१०)[][]
  - घनता ६,९७५ /चौ. किमी (१८,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.portail.irisnet.be


ब्रुसेल्स (फ्रेंच: Bruxelles, Fr-Bruxelles.ogg फ्रेंच उच्चार ; डच: Brussel, Nl-Brussel.ogg डच उच्चार ; जर्मन: Brüssel) ही बेल्जियम देशाची राजधानी व युरोपातील एक प्रमुख शहर आहे. ब्रसेल्स महानगर क्षेत्र हा बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश असून १९ महापालिका ह्या क्षेत्रात मोडतात. बेल्जियमच्या फ्लांडर्सवालोनी ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांची मुख्यालये देखील ब्रुरसेल्समध्येच आहेत. युरोपची राजधानी[] ह्या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रुरसेल्स शहराला युरोपियन संघाचे मुख्यालय असण्याचा मान मिळाला आहे, तसेच नाटो ह्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय ब्रसेल्समध्येच स्थित आहे. इतर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये व कार्यालये ब्रुसेल्समध्ये आहेत.

शहररचना

ब्रुसेल्स महानगर क्षेत्रामध्ये शहरामध्ये एकूण १९ महापालिका आहेत ज्यांमध्ये ब्रसेल्स शहर ही मध्यवर्ती संस्था आहे. ही आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठी महापालिका आहे.

महानगरपालिका

१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
ब्रसेल्स शहरातील १९ प्रभाग
  1. आंदेरलेख्ट
  2. ऑडरगेम
  3. सिंट-अगाथा-बर्चेम
  4. ब्रसेल्स शहर
  5. एटेरबीक
  6. एव्हेर
  7. फॉर्स्ट
  8. गॅन्शोरेन
  9. एल्सेन
  10. येटे
  11. कोकेलबर्ग
  12. सिंट-जान्स-मोलेनबीक
  13. सेंट-गिल्स
  14. सेंट जोसे-टेन-नूड
  15. शेरबीक
  16. उक्केल
  17. वॉटरमेल-बॉसफूर्ड
  18. सिंट-लॅंब्रेख्ट्स-वोलुवे
  19. सिंट-पीटर्स-वोलुवे

वास्तुशास्त्र

ग्रां प्लास व भोवतालच्या इमारती
सेंकांतनेर (Cinquantenaire)
मानेकां पिस (Manneken Pis)

ब्रुसेल्सचे वास्तुशास्त्र विविधरंगी असून येथे पारंपरिक व आधुनिक इमारतींचे मिश्रण आढळते. ग्रां प्लास (Grand Place, Grote Markt) हा ब्रुरसेल्स शहराच्या मध्यभागी असलेला भाग ब्रुसेल्समधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. ग्रां प्लासच्या भोवताली अनेक जुन्या सरकारी इमारती आहेत. जुन्या काळात ग्रां प्लासचा वापर बाजार भरवण्यासाठी केला जात असे.

अ‍ॅटोमियम, शाही राजवाडा, सेंकांतनेर नावाचे मोठे उद्यान इत्यादी ब्रुसेल्समधील इतर उल्लेखनीय वास्तू आहेत. मानेकां पिस हा एका लहान मुलाचा लघवी करण्याच्या क्रियेतील पुतळा ही ब्रुसेल्समधील एक प्रसिद्ध स्थळखूण आहे.

लोकसंख्या

२०१० सालच्या अखेरीस ब्रुसेल्स शहराची लोकसंख्या ११,२५,७२८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १८ लाख होती. ब्रसेल्समधील २५.५ टक्के रहिवासी मुस्लिम धर्मीय आहेत ज्यांपैकी मोरोक्कोआफ्रिकेतील इतर देशांमधून स्थलांतर केलेल्या लोकांचा समावेश आहे. बेल्जियमचे नागरिक नसलेल्या ब्रुसेल्सच्या रहिवाशांची संख्या १९६१ साली केवळ ७ टक्के होती परंतु हीच संख्या २००६ साली ५६ टक्के झाली.[][] ऐतिहासिक काळात संपूर्णपणे डच भाषिक असलेल्या ब्रसेल्समध्ये गेल्या अनेक दशकांपासून फ्रेंच भाषिक रहिवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सध्या ब्रसेल्समधील ५७ टक्के लोक केवळ फ्रेंच भाषा बोलतात. ह्या भाषापरिवर्तनाला ब्रसेल्सचे फ्रेंचीकरण (इंग्लिश विकिपीडियावर) असे संबोधले जाते.

हवामान

ब्रुसेल्सचे हवामान इतर युरोपीय शहरांप्रमाणे सागरी स्वरूपाचे आहे जेथे सौम्य तापमान व उच्च आर्द्रता आढळते. येथे वर्षातील सुमारे २०० दिवस पाऊस पडतो; हिमवर्षा क्वचितच होते.

ब्रुसेल्स साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 5.6
(42.1)
6.4
(43.5)
9.9
(49.8)
13.1
(55.6)
17.7
(63.9)
20.0
(68)
22.4
(72.3)
22.5
(72.5)
18.7
(65.7)
14.4
(57.9)
9.1
(48.4)
6.5
(43.7)
13.9
(57)
सरासरी किमान °से (°फॅ) 0.7
(33.3)
0.6
(33.1)
2.9
(37.2)
4.8
(40.6)
8.9
(48)
11.5
(52.7)
13.6
(56.5)
13.4
(56.1)
10.8
(51.4)
7.6
(45.7)
3.7
(38.7)
1.9
(35.4)
6.7
(44.1)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 71
(2.8)
53
(2.09)
73
(2.87)
54
(2.13)
70
(2.76)
78
(3.07)
69
(2.72)
64
(2.52)
63
(2.48)
68
(2.68)
79
(3.11)
79
(3.11)
821
(32.32)
सरासरी पर्जन्य दिवस 13 10 13 11 11 11 10 9 10 10 13 13 134
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 59 77 114 159 191 188 201 190 143 113 66 45 १,५४६
स्रोत: World Weather Information Service[]

वाहतूक

ब्रसेल्स-दक्षिण रेल्वे स्थानक

ब्रुसेल्स युरोपातील व जगातील इतर देशांसोबत हवाई, रेल्वे व रस्तेमार्गांनी जोडले गेले आहे. ब्रसेल्स विमानतळ हा बेल्जियममधील सर्वात वर्दळीचा विमानतळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. युरोस्टार ह्या रेल्वेने ब्रुसेल्स शहर लंडनसोबत तर टीजीव्हीच्या थालीज रेल्वेने पॅरिस व क्यॉल्न शहरांसोबत जोडलेले आहे. ब्रुसेल्स-दक्षिण हे ब्रुसेल्समधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. शहरी वाहतूकीसाठी ब्रसेल्स मेट्रो ही भुयारी जलद रेल्वे व विस्तृत जाळे असलेली बससेवा उपलब्ध आहे.

जुळी शहरे

ब्रुसेल्सचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[]

संदर्भ

  1. ^ Statistics Belgium; Population de droit par commune au 1 janvier 2008 (excel-file)Population of all municipalities in Belgium, as of 1 January 2008. Retrieved on 18 October 2008.
  2. ^ Statistics Belgium; De Belgische Stadsgewesten 2001 (pdf-file) Definitions of metropolitan areas in Belgium. The metropolitan area of Brussels is divided into three levels. First, the central agglomeration (geoperationaliseerde agglomeratie) with 1,451,047 inhabitants (2008-01-01, adjusted to municipal borders). Adding the closest surroundings (banlieue) gives a total of 1,831,496. And, including the outer commuter zone (forensenwoonzone) the population is 2,676,701. Retrieved on 18 October 2008. [मृत दुवा]
  3. ^ "Brussels". City-Data.com. 10 January 2008 रोजी पाहिले.
  4. ^ (डच) Jan Hertogen (2007-04-04). "Laatste 45 jaar in Brussel: 50% bevolking van autochtoon naar allochtoon". Bericht uit het Gewisse. Non-Profit Data. 2009-01-17 रोजी पाहिले.
  5. ^ (फ्रेंच) Eric Corijn (2007-11-12). "Bruxelles n'est pas le problème, c'est la solution". Vrije Universiteit Brussel (VUB). 2009-01-17 रोजी पाहिले. Toegankelijk via Indymedia.
  6. ^ "Weather Information for Brussels". World Weather Information Service. 6 January 2008 रोजी पाहिले.
  7. ^ "European Forum for Urban Security - Brussels |". 2020-04-07 रोजी पाहिले.
  8. ^ ベルギー3地域と「友好交流及び相互協力に関する覚書」を締結 [Signed a Memorandum of Understanding on Friendship Exchange and Mutual Cooperation with 3 Belgian Regions] (जपानी भाषेत). 15 May 2017. 15 May 2017 रोजी पाहिले.
  9. ^ "List of Atlanta's 17 Sister Cities | Atlanta, GA". www.atlantaga.gov. 2021-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-14 रोजी पाहिले.
  10. ^ "Sister Cities". Beijing Municipal Government. 17 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 September 2008 रोजी पाहिले.
  11. ^ "Berlin – City Partnerships". Der Regierende Bürgermeister Berlin. 21 May 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 September 2013 रोजी पाहिले.
  12. ^ "Brasilia Global Partners". Internacional.df.gov.br. 28 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 February 2014 रोजी पाहिले.
  13. ^ "Medmestno in mednarodno sodelovanje". Mestna občina Ljubljana (Ljubljana City) (स्लोव्हेनियन भाषेत). 14 ऑगस्ट 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 जुलै 2013 रोजी पाहिले.
  14. ^ "Mapa Mundi de las ciudades hermanadas". Ayuntamiento de Madrid. 26 मे 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 जुलै 2009 रोजी पाहिले.
  15. ^ "Discover Montreal" (PDF). mliesl.com. Muskoka Language International. 2007. 2018-10-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 4 January 2017 रोजी पाहिले.
  16. ^ "What Are Twin Towns or Sister Cities?". worldatlas. 21 January 2018 रोजी पाहिले.
  17. ^ "Partnerská města HMP" [Twin Cities HMP]. Portál "Zahraniční vztahy" [Portal "Foreign Affairs"] (झेक भाषेत). 18 जुलै 2013. 25 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 August 2013 रोजी पाहिले.
  18. ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 10 October 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 June 2009 रोजी पाहिले.
  19. ^ "Protocol and International Affairs". DC Office of the Secretary. 13 मे 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 जुलै 2008 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

  • ब्रुसेल्सचा बुर्जुआ
  • ब्रुसेल्स प्रादेशिक गुंतवणूक कंपनी
  • बेल्जियमची रूपरेषा
  • ब्रुसेल्सची सात नोबल घरे
  • युरोपचा पुतळा

बाह्य दुवे