Jump to content

बौधायन

बौधायन हे प्राचीन भारतीय गणितज्ञ होते. त्यांनी शुल्वसूत्रे व श्रौतसूत्रांची रचना केली. गणितामधील भूमिती शाखेमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.


बौधायनांचे सूत्र ग्रंथ:

बौधायनांचे सूत्र ग्रंथ हे वैदिक संस्कृत भाषेत असून प्रामुख्याने धर्म आणि गणिताशी निगडित आहेत. संस्कृत साहित्यातील सूत्रग्रंथांमध्ये बौधायनांचे सूत्रग्रंथ हे सर्वात प्राचीन आहे. या ग्रंथाची रचना अंदाजे इ.स.पू. ८व्या किंवा ९व्या शतकात झाली असावी.

बौधायनांच्या सूत्रग्रंथांमध्ये पुढील ६ ग्रंथांचा समावेश होतो :

१) बौधायन श्रौतसूत्र

२) बौधायन कर्मान्तसूत्र

३) बौधायन द्वैधसूत्र

४) बौधायन गृह्यसूत्र

५) बौधायन धर्मसूत्र

६) बौधायन शुल्बसूत्र

बौधायन शुल्बसूत्रांमध्ये आधुनिक भूमितीमधील काही प्रमेये समाविष्ट आहेत.


बौधायन प्रमेय/ पायथॅगोरसचे प्रमेय :

आज आधुनिक भूमितीमध्ये जे प्रमेय पायथॅगोरसचे प्रमेय म्हणून ओळखले जाते ते बौधायनांनी पायथॅगोरसच्या आधी कित्येक वर्षे आपल्या ग्रंथामध्ये श्लोकस्वरूपात लिहिलेले आहे.

दीर्घचतुरश्रस्याक्ष्णया रज्जुः पार्श्वमानी तिर्यग् मानीच यत् पृथग् भूते कुरूतस्तदुभयं करोति ॥

अर्थात त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्रिकोणाच्या कर्णाच्या वर्गाएवढी असते.


२ चेवर्गमूळ :

आज ज्या संख्यांना गणितात करणी संख्या म्हणले जाते त्या संख्यांची किंमत काढण्याची पद्धत देखील बौधायनांनी आपल्या ग्रंथात नमूद करून ठेवली आहे.

समस्य द्विकर्णि प्रमाणं तृतीयेन वर्धयेत।

तच् चतुर्थेनात्मचतुस्त्रिंशोनेन सविशेषः।।

या पद्धतीने २ चेवर्गमूळ काढल्यास ते पाच दशांश स्थळांपर्यंत अचूक येते.

२  = १ + १/३ + १/(३x४) - (१)/(३x४x३४) =  ५७७/४०८ = १.४१४२१६


बौधायनांची अन्य काही प्रमेये :[] []

) वर्तुळाच्या क्षेत्रफळाएवढा चौरस काढणे

) चौरसाच्या क्षेत्रफळाएवढे वर्तुळ काढणे

) समचतुर्भुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे समकोनात समविभाजन करतात.


संदर्भ

  1. ^ गोडबोले, अच्युत; ठाकूरदेसाई, माधवी. गणिती.
  2. ^ "बौधायन". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-03-02.