बौद्ध धर्माचे संप्रदाय
बौद्ध धर्म |
---|
महायान व थेरवाद हे दोन प्रमुख बौद्ध धर्माचे संप्रदाय आज संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय होते, त्यातील बरेच नष्ट झाले आणि काही कमी अधिक प्रमाणात आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा जास्त बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[१]
रूपरेषा
कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००) | |||||||||||||||||||||
इ.स.पू. ४५० | इ.स.पू. २५० | इ.स. १०० | इ.स. ५०० | इ.स. ७०० | इ.स. ८०० | इ.स. १२०० | |||||||||||||||
| |||||||||||||||||||||
भारत | प्रारंभिक |
|
|
| |||||||||||||||||
प्रारंभिक बौद्ध परंपरा | महायान | वज्रयान | |||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
श्रीलंका आणि |
|
|
|
| |||||||||||||||||
थेरवाद | |||||||||||||||||||||
|
|
| |||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
| प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म | ||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
Kadam | |||||||||||||||||||||
Kagyu |
| ||||||||||||||||||||
Dagpo | |||||||||||||||||||||
Sakya | |||||||||||||||||||||
Jonang | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
पूर्व आशिया | प्राचीन बौद्ध संस्कृती | Tangmi | |||||||||||||||||||
नांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū) | शिंगोन बौद्ध धर्म | ||||||||||||||||||||
चान बौद्ध धर्म |
| ||||||||||||||||||||
Thiền, कोरियन सेआॅन | |||||||||||||||||||||
जपानी झेन | |||||||||||||||||||||
Tiantai / जिंगतू |
| ||||||||||||||||||||
तेंदाई |
| ||||||||||||||||||||
ज्युदो शू | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
मध्य आशिया |
| ग्रीक बौद्ध धर्म | |||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
रेशीम मार्ग बौद्ध धर्म | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
इ.स.पू. ४५० | इ.स.पू. २५० | इ.स. १०० | इ.स. ५०० | इ.स. ७०० | इ.स. ८०० | इ.स. १२०० | |||||||||||||||
|
इतिहास
दुसरी धम्म परिषद
बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. बुद्ध धम्माच्या नियमातील नरमपणा व विहार संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपुत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपुत्त संघ मानतो की त्यांचे आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशांतील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्या देशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशांत धम्म प्रचार झालेला होता, त्या देशांतील भौगोलिक परिस्थितीमुळे बौद्ध धम्मातील प्राथमिक नियम प्रथम तिथले लोक आचरणात आणू शकले नव्हते.
दुसऱ्या धम्मपरिषदेची बैठक
दिवसेंदिवस बौद्ध धर्मीयांची वाढ झपाट्याने होत गेली. भिक्खुंची संख्या, उपासकांची यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश ककंदपुत्त यांनी ७००० अरहंत भिक्खूंसमवेत वैशाली येथे केवल भिक्खूंचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन वज्जीपुत्त भिक्खूसंघाच्या १० सूचनांवर चर्चा करून निष्कर्ष काढला की, त्या धम्मास हानिकारक आहेत. त्यावेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती. म्हणून भिक्खू यशने सुधारित धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली. त्यावेळी वज्जीपुत्त संघाने स्वतंत्र वज्जीपुत्त भिक्खूसंघाची दुसरी बैठक घेतली. हा प्रसंग धम्मसंघाचे दोन स्वतंत्र संघ तयार होण्याचे कारण होय.
धम्मप्रसार
वज्जीपुत्त संघाने महायान संघ म्हणून धर्म कार्य सुरू ठेवले तर दुसरा संघ हीनयान होय. जो आज थेरवादी म्हणून ओळखला जातो. ह्या हीनयानी थेरवादी संघास दक्षिणी धम्मसंघ म्हणून व महायान संघास उत्तरीय संघ म्हणून ओळखले जाते. अर्थात हीनयान म्हणजे थेरवाद नव्हे, हीनयान व महायान शब्दाविषयी विविध अर्थ लावण्यात येतात.
अशोकाचा काळ
महान सम्राट अशोकांच्या काळात जवळ जवळ १८ ते २० बौद्ध संप्रदाय अस्तित्वात होते. महायान व हिनयान यांचे अनेक उपसंप्रदाय होते. हिनयान पंथाचे ११ तर महायान पंथाचे ७ प्रकार झालेला आढळतात. परंतु या उपसंप्रदायापैकी कोणताही संप्रदाय जास्त काळ अस्तिस्वात राहिला नाही. वज्रयान हासुद्धा असाच संप्रदाय आहे. हा संप्रदाय तिबेट, भूतान, मंगोलिया, लडाख व आसाम येथे अस्तित्वात आहे. आज हीनयान ऐवजी थेरवाद ह्या शब्दाचाच योग्य अर्थी वापर केला जातो. सम्राट अशोकांच्या काळात थेरवाद बौद्ध संप्रदायाचा झपाट्याने प्रसार झालेला होता. तर सम्राट कनिष्कांच्या काळात महायान संप्रदायाचा प्रसार झपाट्याने झाला.
थेरवाद संप्रदाय
बौद्ध धर्माचा प्रमुख व दुसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे. आणि हा संप्रदाय मुख्यतः आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्याक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्याक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांतसुद्धा बऱ्याच मोठ्या संख्येने आहे.[२]
महायान संप्रदाय
महायान (पूर्व बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान हा व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, तैवान, मकाव आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे
वज्रयान संप्रदाय
वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा आणि बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयान हा महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय मानला जातो. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया, भारताच्या लद्दाख, आसाम यासारख्या हिमालयीन क्षेत्रांत तसेच रशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक रूपात राहतात. हा संप्रदाय जगभर पसरला आहे.
नवयान संप्रदाय
नवयान बौद्ध धर्म हा भारतातील मुख्य बौद्ध संप्रदाय आहे. यांस भीमयान असेही म्हणले जाते. २०व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध आंदोलनाने या संप्रदायाची सुरुवात केली होती आणि याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातीयता नष्ट करणे तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करणे हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांमधल्या (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ७७% अधिकृत बौद्ध लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे.