Jump to content

बोरा बोरा

नासाच्या उपग्रहाने घेतलेले बोरा बोरा बेटाचे चित्र

बोरा बोरा हे पॅसिफिक महासागरातील एक बेट आहे. ते फ्रेंच पॉलिनेशियाच्या सोसायटी द्वीपसमूहाच्या लीवार्ड गटाचा एक भाग आहे. याचे क्षेत्रफळ २९.३ चौ.किमी आहे. हे बेट खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि प्रवालभित्तीने वेढलेले आहे.

बोरा बोरा हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे. ते तिथल्या आलिशान रिसॉर्ट्‌साठी प्रसिद्ध आहे. २००८ सालच्या जनगणनेनुसार येथे कायम वास्तव्य असणाऱ्यांची लोकसंख्या ८,८८० आहे.

बोरा बोरा बेटाचे पॅनारोमिक छायाचित्र