Jump to content

बोधलेबुवा

माणकोजी भानजी जगताप तथा बोधलेबुवा हे एक मराठी संत होते. ते बार्शी तालुक्यातील धामणगावचे राहणारे होते. वडील भानजी जगताप हे बरीदशाहीत देशमुख होते.

माणकोजींचे थोरले भाऊ शिवाजी हे नियमितपणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते. परंतु एकदा माणकोजीवर पंढरपूरला जाण्याची वेळ आली. तेव्हा विठ्ठलाचे साक्षात दर्शन घेण्याची इच्छा होऊन त्यांनी देवाला साकडे घातले. त्यावेळी

विठ्ठला एकांती बोधिले । बोधले नाम तया ।।

तेहापासून जगतापचे ते बोधले झाले. तेही पुढे देशमुख झाले. त्यांचा विवाह राळेरास येथील निच्चळ घराण्यातील ममताईशी झाला होता. त्यांच्यापासून त्यांना ३ मुले झाली. १. लखमोजी २. यमाजी ३. विठोजी . त्या काळात श्रीसंत माणकोजी महाराज हे नामवंत संत असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकापर्यंत त्यांचा महिमा पसरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच, छत्रपती शाहू, माधवराव पेशवे, हिंदुराव घोरपडे यांनी बोधलेबुवांना गुरुस्थानी मानले होते.

बोधलेबुवांना साक्षात नवनाथानी दर्शन देऊन नऊ वस्तू दिल्या. पांडुरंगाने स्वतः त्या वस्तू बोधलेबुवांना परिधान करून जोग घेण्यास सांगितले ,त्या नऊ वस्तू परिधान करून जोग घेण्याची परंपरा आजही बोधले घराण्यामध्ये आहे

महिपतबुवा ताहराबादकर यांनी संत बोधलेबुवांचे चरित्र लिहिले आहे.