बोथे
?बोथे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | १३.३७५२ चौ. किमी • १,०६० मी |
जवळचे शहर | फलटण |
जिल्हा | सातारा जिल्हा |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर | १,१०६ (२०११) • ८३/किमी२ ०.९५ ♂/♀ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोली भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • ४१५५०३ • एमएच/११ |
बोथे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. सातारा जिल्ह्यातील पहिली सहकारी सोसायटी बोथे गावात सुरू झाली होती.
प्राथमिक माहिती
समुद्र सपाटीपासून उंची: 1060 मीटर / 1.060 किलोमीटर
क्षेत्रफळ: 1337.52 हेक्टर./ 13.3752 चौरस किलोमीटर
लोकसंख्या: 1106.
कुटुंबे: 257.
पुरुष: 540.
महिला: 566.
भौगोलिक स्थान
बोथे गाव महादेेव डोंगररांगेेतील डोंगरावर वसले आहे. या डोंगराची उंची समुद्रसपाटीपासुुन १०६०मी एवढी आहे. तसेेेच बोथे महादेेव डोंगररांगेतील सर्वांत उंच डोंगर आहे.
हवामान
येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३५ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २५ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण मध्यम असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.तसेच एप्रिल ते मे दरम्यान वळीवाचा पाऊस पडतो. गाव डोंगरावर असल्याने आणि शहरापासून दूर असल्याने हवा शुद्ध आहे.
लोकजीवन
यात्रा उत्सव
गावातील महादेवदऱ्यातील श्री नाथांचे मंदिर हे बोथे गावातील नाथ देवाचे मूळ स्थान आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला गावात श्री नाथ साहेबांची यात्रा असते. यात्रेच्या आदल्या रात्री देवाची पालखी या मंदिरापाशी आणली जाते, तेव्हा ती हलकी असते. रात्री उशिरापर्यंत गावकरी इथेच असतात. जेव्हा पालखी जड लागू लागते तेव्हा देव पालखीत बसले असे म्हणतात. त्यानंतर श्रींची पालखी वाजत गाजत गावातील मंदिरात आणली जाते.
मूळ स्थानावरून देव पालखीत बसल्यावर पालखी गावातील नाथांच्या मंदिरात आणली जाते. सकाळी पालखीला गोंडे(मोर्चेल) बांधून सजवून रथात ठेवतात. पूर्वी रथ नव्हता तेव्हा भोई पालखी उचलायचे आणि ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करायचे. पालखी प्रत्येकाच्या दारात थांबायची. अंगणात अंथरलेल्या चादरीवर पालखी ठेवली जायची. ज्यांच्या घरी लहान मुले असत, ते लोक त्या लहान मुलांना चादरीवर झोपवत. पालखी मुलांना स्पर्श न होता त्यांच्यावर ठेवली जात असे. पालखीचे पाय मोठे असत, त्यामुळे पालखी मुलांवर अधांतरी राही. पालखीसमोर सनई, पिपाण्या वाजायच्या. घरातील सर्वांचे देवदर्शन आणि नैवेद्य झाल्यानंतर "नाथ साहेबाच्या नावानं चांगभलं! काळभैरीच्या नावानं चांगभलं!"च्या जयघोषात पालखी उचलली जायची. जाणाऱ्या देवावर लोक गुलाल, खोबरे, भुईमुगाच्या शेंगा यांची उधळण करायचे. आता रथ आला असला तरी यात्रेत लोकांचा उत्साह पहायला मिळतो. ग्रामपंचायतीसमोर रथ थांबल्यावर मुक्तहस्ते गुलालाची उधळण करण्यात येते. रथासमोर शाळकरी मुलांचे लेझीम, ढोलपथक, तसेच प्रौढांचे गजी नृत्य बघायला मिळते. यात्रेची पद्धत जरी बदलली असली तरी गुलाल खोबऱ्याची उधळण, लोकांचा उत्साह आणि नाथांची कृपा आजही कायम आहे.
वारकरी आणि माळकरी यांचे गाव म्हणून प्रसिद्ध.
शैक्षणिक सुविधा
गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.
तसेच रयत शिक्षण संस्थेचे 'न्यु इंग्लिश स्कुल बोथे'ही माध्यमिक शाळा आहे.
प्रेक्षणीय स्थळे
गावात श्री नाथांचे मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, निसर्गरम्य महादेवदरा, कुरण नावाच्या शिवारातील तलाव, अनेक पवनचक्क्या ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. तसेच गावातून सूर्योदय व सूर्यास्ताचे विहंगमय दृश्य दिसते. तसेच गावातून नेर तलाव आणि आंधळी धरण ही खटाव आणि माण तालुक्यातील महत्त्वाची दोन्ही धरणे दिसतात.
नागरी सुविधा
शुद्ध पिण्याचे पाणी- गावात आरो वॉटर प्युरीफायर एटीएम आहे.
वाहतुकीसाठी सिमेंट काँक्रीट रस्ते आहेत.
एसटी आहे.
वि.का.स. सोसायटी आहे.
बचत गट आहे.
वर्तमानपत्र आहे.
जवळपासची गावे
कुळकजाई, खोकडे, रणशिंगवाडी, बुध, मलवडी, शिरवली, राजापूर, जरांबी, सिताबाईचा डोंगर.