Jump to content

बोईंग ७१७

बोईंग ७१७
प्रकार आखूड पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दोन इंजिनांचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत, उत्पादन बंद

बोईंग ७१७ तथा मॅकडॉनल डग्लस एम.डी. ९५ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे आखूड पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ११७ पर्यंत प्रवासीक्षमता असलेल्या या विमानाला ३,८२० किमीचा पल्ला आहे. याला सहसा दोन रोल्स-रॉइस बीआर७१५ टर्बोफॅन इंजिने लावलेली असतात. ही इंजिने विमानाच्या शेपटीकडील भागाला लावलेली असतात.