बोंबील
बोंबील (शास्त्रीय नाव: Harpadon nehereus, हार्पेडन नीहेरस ; इंग्लिश: Bombay duck, बॉंबे डक ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बॉंबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.
हा मासा ताजा, तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हणले जाते. सुक्या बोंबलाची चटणी खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चटणीला माशांना येणारा वैशिष्ट्यपूर्ण दर्प येतो.