Jump to content

बोंड अळी

बोंड अळी या अळीची मादी पिकाचे बुंध्यावर व पानांवर अंडी देते.याचे पूर्ण वाढ झालेल्या अळ्या उपजिवीकेसाठी पिकांची पाने व बोंड कुरतडून खातात.त्यामुळे उत्पन्न कमी होते.

वर्णन

ही सुमारे एक इंच लांबीची असून,गुलाबी रंगाची साधारणतः असते. हिच्या अंगावर राठ केस असतात ज्यामुळे पक्षी तीला खात नाहीत.[]या अळीचा प्रादुर्भाव सहसा कपाशीवर दिसुन येतो.

व्यवस्थापन

  • दर सालाच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतशिवार कपाशीमुक्त करणे.
  • बाजार समित्या व कॉटनमिल व जेथे कापुस मोठ्या प्रमाणात साठविण्यात येतो तेथे कामगंधप्रकाश सापळे लावणे.
  • जमिनीची खोलवर नांगरणी करून ती उन्हाळ्यात तापू देणे.
  • पूर्वहंगामी कापुस लावणी टाळणे व पावसाळा सुरू झाल्यावर लावणी करणे.
  • लावणीसाठी साधारणतः १४० ते १६० दिवसांत येणारे कपाशीचे वाण निवडण्यात यावे.
  • कपाशी पिकासोबत सापळा पीक म्हणून भेंडीची एक ओळ भोवताल लावणे.
  • ऑगस्ट महिन्यापासून पिकात कामगंध सापळे लावल्याने त्याद्वारे या आळीचे पतंग आकर्षित होऊन मरतात व त्याने अळीच्या उत्पादनास आळा बसतो.
  • कीटनाशके व संजीवके तसेच अन्नद्रव्ये याचे मिश्रण करून फवारणी टाळणे.
  • गावपातळीवर एकाचवेळी सर्वांनी उपाययोजना केल्यास यावर नियंत्रण शक्य आहे.

संदर्भ

बाह्य दुवे