बेल्जियम क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२१
बेल्जियम क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२१ | |||||
माल्टा | बेल्जियम | ||||
तारीख | ८ – १० जुलै २०२१ | ||||
संघनायक | बिक्रम अरोरा | शाहयेर बट (१ली-४थी ट्वेंटी२०) निमीश मेहता (५वी ट्वेंटी२०) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बेल्जियम संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हेनरिक ग्रीक (८९) | हदीसुल्लाह ताराखेल (१५४) | |||
सर्वाधिक बळी | वशीम अब्बास (११) | बर्मन नियाझ (८) | |||
मालिकावीर | बर्मन नियाझ (बेल्जियम) |
बेल्जियम क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान माल्टाचा दौरा केला. नियोजनानुसार माल्टा संघ मे २०२१ मध्ये बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार होता. बेल्जियममध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेल्जियमने माल्टाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. सर्व सामने मार्सा मधील मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान येथे खेळविण्यात आले.
बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकत पहिला वहिला मालिका विजय संपादन केला. तसेच हा मालिका विजय विदेशी भूमीवर बेल्जियमने मिळवलेला पहिला मालिका विजय ठरला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
बेल्जियम ९९ (२० षटके) | वि | माल्टा १०३/४ (१६.२ षटके) |
मुहम्मद मुनीब ३० (४४) वशीम अब्बास ३/२२ (४ षटके) | निरज खन्ना ३५* (२४) अशीकुल्लाह सैद २/२७ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
- माल्टा आणि बेल्जियम मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बेल्जियमने माल्टामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- मुहम्मद बिलाल, अशोक बिश्नोई (मा) आणि हदीसुल्लाह ताराखेल (बे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेल्जियमवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
माल्टा ५० (१३ षटके) | वि | बेल्जियम ५२/० (५.३ षटके) |
वरूण थामोथरम १५ (१४) बर्मन नियाझ ४/८ (४ षटके) | हदीसुल्लाह ताराखेल ४५* (२१) |
- नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
- सैद हकीम, बर्मन नियाझ आणि सनी शेख (बे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३रा सामना
माल्टा ११४/९ (२० षटके) | वि | बेल्जियम ११५/६ (१८.३ षटके) |
सॅम्युएल स्टॅनिस्लस ३५ (४२) शेराझ शेख ३/२२ (३ षटके) | साबेर झकील ३२ (१९) बिलाल मुहम्मद २/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, क्षेत्ररक्षण.
४था सामना
बेल्जियम १२८ (१९.३ षटके) | वि | माल्टा १३० (१९.२ षटके) |
शरुल मेहता ४० (५६) वशीम अब्बास ४/२३ (४ षटके) | सॅम्युएल स्टॅनिस्लस ३४ (३५) अशीकुल्लाह सैद ३/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
- सामन्यादरम्यान बेल्जियमच्या एका खेळाडूद्वारे नियमांचे उल्लघन झाल्याने माल्टाला ५ धावा नुकसानभरपाईच्या स्वरुपात बहाल करण्यात आल्या. माल्टाचा संघ १२५ धावांवर सर्वबाद झाला परंतु ५ धावा बहाल मिळाल्यामुळे माल्टाची धावसंख्या १३० वर गेली. तथापी माल्टाला विजयी घोषित करण्यात आले.
५वा सामना
बेल्जियम १७२/६ (२० षटके) | वि | माल्टा १३३ (१८.४ षटके) |
हदीसुल्लाह ताराखेल ७८ (४०) वशीम अब्बास २/२३ (४ षटके) | हेनरिक ग्रीक ५५ (३३) साबेर झकील ३/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.