Jump to content

बेलोनिया

बेलोनिया हे भारताच्या त्रिपुरा राज्यामधील दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील एक शहर आणि नगर परिषद आहे. हे शहर दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. बेलोनिया राष्ट्रीय महामार्ग १०८अ द्वारे जोलाईबारी आणि राष्ट्रीय महामार्ग ८ द्वारे जोलाईबारी ते राज्याची राजधानी अगरतळाशी जोडलेले आहे. बेलोनिया भारत-बांगलादेशच्या सीमेवर आहे.

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [] बेलोनिया नगरपरिषदेची लोकसंख्या १९,९९६ होती. लोकसंख्येच्या 52% पुरुष आणि 48% स्त्रिया आहेत. बेलोनियाचा सरासरी साक्षरता दर ९५% होता, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त होता; 54% पुरुष आणि 46% स्त्रिया साक्षर आहेत. 9% लोकसंख्या 6 वर्षांपेक्षा कमी वयाची होती.

वाहतूक

बेलोनिया रेल्वे स्थानक(संकेत: BENA) आगरतळाशी (संकेत:AGTL) फेब्रुवारी २०१९पासून जोडलेले आहे. सध्या दररोज (रविवार वगळता) बेलोनिया आणि आगरतळा दरम्यान २ गाड्या धावतात. [] हे स्थानक आगरतळा - सबरूम रेल्वे विभागावर आहे, जे ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग रेल्वे विभागांतर्गत येते. आगरतळा ते सबरूम मार्गे उदयपूर हा मार्ग ३ ऑक्टोबर, २०१९ रोजी कार्यान्वित झाला. [] []

संदर्भ

  1. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ "BLNIA/Belonia Railway Station Map/Atlas NFR/Northeast Frontier Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2017-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ IANS (22 February 2016). "First Commercial Broad Gauge Freight Train Arrives In Tripura". NDTV. 19 July 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "TRIPURAINFO : The first news, views & information website of TRIPURA". 2016-03-21. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-03-21. 2017-03-21 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)