बेलीझ सिटी
बेलीझ सिटी Belize City | ||
बेलीझमधील शहर | ||
| ||
बेलीझ सिटी | ||
देश | बेलीझ | |
जिल्हा | बेलीझ जिल्हा | |
स्थापना वर्ष | इ.स. १६३८ | |
क्षेत्रफळ | ३५.६७ चौ. किमी (१३.७७ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ० फूट (० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ३५,६६७ | |
प्रमाणवेळ | यूटीसी−०६:०० |
बेलीझ सिटी ही बेलीझ देशाची भूतपूर्व राजधानी, बेलीझ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र व बेलीझमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बेलीझच्या पूर्व भागात कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते बेलीझचे प्रमुख बंदर तसेच आर्थिक व औद्योगिक केंद्र आहे.
१९६१ सालातील विनाशकारी वादळामध्ये बेलीझ सिटी जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर बेल्मोपान ह्या शहराची निर्मिती करण्यात आली व तेथे राजधानी हलवण्यात आली.