बेलारी
बेलारी हे महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव संगमेश्वराजवळ आहे. गावाजवळच्या डोंगरावर टिकलेश्वर मंदिर आहे. टिकलेश्वराशिवाय गणेश मंदिर, पाटलांचा मळा(मैदान), सांबादेवाचे मंदिर ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. बेलारी हे बेलारी पंचक्रोशीतील मध्यवर्ती गाव आहे. गावात दहावी पर्यंत शिकण्याची सोय आहे. "आदर्श माध्यमिक विद्यामंदिर बेलारी" हे पंचक्रोशीतील महत्त्वाचे विद्यालय आहे. गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. गावात नोकरीच्या फारश्या संधी नसल्यामुळे बरेच तरुण नोकरीसाठी मुंबईला स्थायिक झाले आहेत. गावात सर्व सण ऊत्साहाने साजरे केले जातात. त्यावेळी मात्र सर्व मुंबईकर चाकरमानी गावाला आवर्जून येतात. होळी,गणेशोत्सव १६ मे (गणेश मंदिर वर्धापन दिवस) हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावाचे गतवैभव प्राप्त करून द्यायची जबाबदारी युवकांची आहे. पण ही जवाबदारी झटकून बरेच तरुण मुंबईला प्रस्थान झालेले आहेत. लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रथमत: गावात रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.