बेरिंग समुद्र
बेरिंग समुद्र (रशियन: Чуко́тское мо́ре) हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र रशियामधील सायबेरिया व कामचत्का द्वीपकल्पाच्या पूर्वेस व अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. उत्तरेला बेरिंगची सामुद्रधुनी बेरिंग समुद्राला आर्क्टिक महासागरामधील चुक्ची समुद्रासोबत जोडते तर बेरिंग समुद्राच्या दक्षिणेस ॲल्युशन द्वीपसमूह स्थित आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत