बेबी (२०१५ चित्रपट)
बेबी | |
---|---|
दिग्दर्शन | नीरज पांडे |
निर्मिती | भूषण कुमार, किशन कुमार |
कथा | नीरज पांडे |
प्रमुख कलाकार | अक्षय कुमार डॅनी डेंझोग्पा अनुपम खेर के.के. मेनन तापसी पन्नू |
संगीत | मीत ब्रोज अंजान |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २३ जानेवारी २०१५ |
वितरक | टी. सीरिज |
अवधी | १५९ मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹ ५८.९७ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹ १२५ कोटी |
बेबी हा एक २०१५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड थरारपट आहे. अ वेन्सडे व स्पेशल २६ नंतर नीरज पांडेने दिग्दर्शित केलेला हा तिसरा हिंदी चित्रपट होता. बेबीचे काल्पनिक कथानक भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांना पकडणाऱ्या एका सुरक्षा पथकाच्या साहसकथांवर आधारित आहे. अक्षय कुमार, डॅनी डेंझोग्पा व अनुपम खेर ह्यांच्या बेबीमध्ये आघाडीच्या भूमिका आहेत. बेबी २३ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला व त्याला टीकाकार व प्रेक्षकांचा उत्सुर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः अक्षय कुमारच्या अभिनयाचे व नीरज पांडेच्या दिग्दर्शनाचे समीक्षकांनी कौतुक केले.
कलाकार
- अक्षय कुमार
- डॅनी डेंझोग्पा
- अनुपम खेर
- राणा दग्गुबाती
- तापसी पन्नू
- के.के. मेनन
- सुशांत सिंह
- मधुरिमा तुली
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील बेबी चे पान (इंग्लिश मजकूर)