बेन्तो
बेन्तो (弁当[जपानी उच्चार: बेन्तोउ] ) म्हणजे जपान मधे मिळणारा डब्यात किंवा खोक्यात बांधलेला उपहाराचा प्रकार आहे. हा उपहार एका व्यक्तिच्या एका भोजनासाठी पुरेसा असतो. पारंपारिक बेन्तो मधे थोडासा भात, मास-मच्छी पासून बनवलेला एखादा पदार्थ आणि खारवलेल्या किंवा शिजवलेल्या भाज्या असे घटक असतात. एका वापरानंतर फेकून देण्यासारख्या पुठ्ठ्याच्या खोक्यांपासून सुंदर नक्षीकाम केलेल्या कचकड्याच्या डब्यांपर्यंत अशा वस्त्तुंचा उपयोग बेन्तोतील पदार्थ बांधण्यासाठी केला जातो. खाऊची दुकाने, उपहारगहे, खास बेन्तोची दुकाने (弁当屋 [जपानी उच्चार: बेन्तोउ या] ), किराणा-भुसाराची दुकाने, रेल्वे स्थानक, अशा ठिकाणी बेन्तो सहजपणे उपलब्ध असतो; तरी देखील जापानी गृहिणी आजूनही नवरा, मुले आणि स्वतःसाठी रोजचा डबा बनवताना अढळतात.
जपान मधील बेन्तो आणि भारतातील जेवणाचा डबा किंवा टिफिन यात खूप साधर्म्य आहे. अशाचं संकल्पने वर आधारित फिलिपाईन मधे बाओन, कोरिया मधे दोसिराक आणि तायवान मधे बिअन्डाञ्ग मिळतात.