Jump to content

बेटी जिंदाबाद बेकरी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेटी जिंदाबाद बेकरीला नारी शक्ती पुरस्कार देताना

बेटी जिंदाबाद बेकरी ही छत्तीसगड राज्यातील जशपूर जिल्ह्यातील एका गावात इ.स. २०१७ मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. या बेकरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या बेकरीमध्ये भारतात मानवी तस्करी तुन वाचलेले कर्मचारी काम करतात. आणि यामुळेच भारतातील स्त्रियांना किंवा त्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेस देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार या बेकरीला इ.स. २०१७ साली देण्यात आला[]

इतिहास

छत्तीसगड राज्याच्या जशपूर जिल्ह्यातील कनसाबेल गावात 'बेटी जिंदाबाद बेकरीची' इ.स. २०२७ मध्ये स्थापना करण्यात आली.[] मानवी तस्करीतुन वाचलेल्या लोकांना ही बेकरी रोजगार पुरवते. केक आणि कुकीज विकणारी आणि जशपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेली ही बेकरी गावातील एकमेव बेकरी आहे.[] या बेकरीत साधारणतः १५ ते २२ वर्षे वयोगटातील महिला काम करतात. या महिलांना खास करून महाराष्ट्रातील पुणे येथील विज्ञान आश्रमात बेकरीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. बऱ्यापैकी अनुभव आणि सराव आल्यावर 'जिल्हा व्यापार उद्योग' आणि 'महिला व बाल विकास विभाग' यांच्या मदतीने कर्ज मिळवून बेकरी उघडण्यात आली. लवकरच पुढील काही दिवसांनी म्हणजे इ.स. २०१८ पर्यंत बेकरी दैनंदिन नफ्यात मिळवायला लागली. साधारणतः येथील दहा कर्मचारी त्यांचा प्रारंभिक खर्च प्रति महिना ८,८०० रुपये प्राप्त करू शकत होते. यात इतर खर्चामध्ये अनुक्रमे ४,००० रुपये बेकरीचे दरमहा भाडे आणि वीज बिल ५,२०० रुपये समाविष्ट आहे.[][][]

पुरस्कार

या बेकरी कामगारांना इ.स. २०१७ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात बक्षीस म्हणून निव्वळ रक्कम १,००,००० रुपये रोख आणि प्रमाणपत्र पुरस्कार म्हणून देण्यात आले. ही बेकरी भारतभरातील असंख्य प्रकल्पांपैकी असा एक प्रकल्प / उद्योग आहे, ज्याचा उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे, ज्यांना रोजगार मिळणे कठीण वाटते.[][][] []

हा प्रकल्प सध्या भारतातील सामान्य माणसाच्या आयुष्यात उत्साह आणणारा ठरला असून, सध्या येथे गरीब, होतकरू आदिवासी २० महिलांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याशिवाय या महिलांना भारतात इतरत्र असा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री बेरोजगार योजनेतून कर्ज आणि मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे महिला उद्योजिकाना आर्थिक पाठबळ मिळवून देणे, महिला सक्षमीकरण करणे, समाजात कमावती महिला म्हणून उभे करून त्यांच्याद्वारे त्यांच्या घरच्या परिस्थितीस आर्थिक हातभार मिळवून देणे असा शासनाचा मानस आहे.[]

संदर्भ

  1. ^ a b "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. IANS. 9 March 2018. 14 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Sharma, Chirali (31 December 2019). "5 Cafes Around India That Are Run By Acid Attack Victims, The Disabled And HIV Positive Staff". ED Times. 26 July 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Ghosh, Madhusree (23 June 2018). "Kolkata to Mumbai: Cafés give acid attack victims, disabled a chance in life". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 26 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ a b Rashmi, Drolia (7 March 2018). "Trafficked survivor of 'Beti Zindabad bakery' bags national award on Women's Day". The Times of India (इंग्रजी भाषेत). 3 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
  5. ^ a b Drolia, Rashmi (25 December 2017). "Chhattisgarh: Jashpur trafficking survivors now bakers of Christmas cakes". The Times of India (इंग्रजी भाषेत).
  6. ^ a b Ghose, Dipankar (12 May 2018). "Trafficking victims script success story with bakery in Chhattisgarh town". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 21 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "First of its kind, 'Beti Zindabad Bakery' empowers women rescued from Human Trafficking - NewsBharati" (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.