बेकीज
चित्र:Bakeys edible cutlery brand logo.png बेकीज चा लोगो | |
व्यापारातील नाव | बेकीज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड |
---|
बेकीज ही तेलंगणाच्या हैदराबाद येथील भारतीय खाद्य कटलरी उत्पादन करणारी स्टार्टअप कंपनी आहे. [१] [२] स.न. 2010 मध्ये याची सुरुवाता झाली होती. ICRISAT येथील संशोधक नारायण पीसपती याने डिस्पोजेबल प्लास्टिकच्या भांड्यांना एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून बांबू, लाकूड, कागद सारख्या पदार्थांपासून तयार केलेल्या गोष्टीं बनवल्या . [३] [४]
इतिहास
२०१० मध्ये हैदराबादमध्ये नारायण पीसपॅथीने बेकीजची स्थापना केली. एप्रिल २०१६ मध्ये त्याने कीटोच्या माध्यमातून सुमारे 25 लाख (US$५५,५००) जमवले. त्याचे प्रारंभिक ध्येय फक्त 1 लाख (US$२,२००) एव्हडेच होते. कीटोच्या माध्यमातून त्याला १५००हून जास्त लोकांनी मदत केली. या पाठिंब्यानंतर कंपनीने आपली पोहोच वाढवण्यासाठी किकस्टार्टर मोहीम सुरू केली. एप्रिल २०१६ मध्ये कंपनीचे ३० कर्मचारी होते. मे २०१७ पर्यंत कंपनीने अद्याप किकस्टार्टर मोहिमेच्या पाठीराख्यांना उत्पादने पाठविण्यास सुरुवात केली नव्हती. भारतातल्या ग्राहकांना चमचे पाठवण्यास सुरुवात झाली होती. जानेवारी २०१९ मध्ये, नारायण पीसापाटी यांना बँक ऑफ महाराष्ट्रची २.५ कोटी (US$५,५५,०००)ची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली गेली [५]
संदर्भ
- ^ About us
- ^ Move over, disposable utensils, because Bakeys edible cutlery is here
- ^ Profile of the founder
- ^ India’s Bakey edible spoon does two of my favorite things: limits dishes and plastic waste
- ^ "PressReader.com - Your favorite newspapers and magazines". www.pressreader.com. 2020-06-19 रोजी पाहिले.