बॅराकुडा
genus of fishes, the Barracudas | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
माध्यमे अपभारण करा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
विकिपीडिया Wikispecies | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
प्रकार | टॅक्सॉन | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आरंभ वेळ | 57 millennium BC | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बॅराकुडा हा म्युजिलिफॉर्मिस गणाच्या स्फिरीनिडी कुलातील मासा आहे. या कुलातस्फिरीना हा एकच वंश असून त्यातील २० जातींच्या माशांना बॅराकुडा हे नाव देतात, तसेच त्यांना ‘सी पाइक’ असेही म्हणतात. त्यांचा प्रसार उष्ण सागरांत जगभर सर्वत्र आहे, काही जाती समशीतोष्ण कटिबंधातही आढळतात.
माहिती
मोठ्या किंवा हिंस्त्र बॅराकुड्याचे शास्त्रीय नाव स्फिरीना थॅराकुडा असे आहे. तो पिक्युडा किंवा बेक्युना या नावानेही ओळखला जातो. त्याची लांबी २ मी. पर्यंत असते. त्याचे डोके लांबलचक व टोकदार असते. शरीर पाइक माशासारखेच काहीसे गोलसर व लांब असते. ते चक्रज (चक्राकार) खवल्यांनी आच्छादिलेले असते व त्याची पार्श्विक रेखा [शरीराच्या दोन्ही बाजूंवर असलेली व संवेदनाक्षम पेशींची जागा दाखविणारी लांबीच्या दिशेत असलेली रेषा; ⟶ पार्श्विक रेखा] सुस्पष्ट असते. त्याचे दोन्ही जबडे लांब असतात व खालचा जबडा वरच्या पेक्षा पुढे आलेला असतो. दोन्ही जबड्यांवर व टाळूवर अगदी तीक्ष्ण व बळकट सुळ्यासारखे भयानक दात असतात. तो खादाड असून लहान माशांवर उपजीविका करतो. तो बहुधा एकटाच फिरत असतो. उष्ण कटिबंधी शैलभित्तींमध्ये (पाण्याच्या पृष्ठालगतच्या खडकाळ भागामध्ये) तो लपून स्थिर राहतो किंवा मंद गतीने पाण्यात सरकत जातो; त्या वेळी तो बहुधा आपल्या सावजाच्या शोधात असतो. पाण्यात वाहत जाणाऱ्या किंवा हलणाऱ्या कोणत्याही वस्तूवर तो झडप घालतो. अल्पसे अंतर का होईना तो अत्यंत वेगाने जाऊ शकत असल्यामुळे तो लहान माशांवर सहज झडप घालू शकतो.
सागरस्नान करणाऱ्यांना मोठ्या बॅराकुड्यापासून धोका असतो कारण तो माणसावरही हल्ला करतो; परंतु तो शार्क एवढा धोकदायक नाही, तरीही जनमानसात त्याबद्दल बऱ्याच अतिशयोक्त कल्पना असल्याचे दिसते. तो एक उत्तम क्रीडामत्स्य आहे. काही सागरांत बॅराकुड्याच्या शरीरात विषारी द्रव्य जाते व असे मासे खाण्यात आल्यास ‘सिग्वाटेरा’ नावाने ओळखली जाणारी विषबाधा होते. तीमध्ये तीव्र स्वरूपाचा जठरांत्रदाह (जठर व आतड्याचा दाह) होतो. अशी विषवाधा मध्य व दक्षिण अमेरिकेत झाल्याचे ऐकिवात आहे.
स्फि. कॉमरसोनी, स्फि. ॲंक्युटिपेनिस, स्फि. ऑब्युसेटा व स्फि. जेलो या जाती भारतात आढळतात. भारताच्या सागरी मासेमारी बॅराकुड्याचे प्रमाण ०.२ टक्के असते. बॅराकुडा उत्तम खाद्य मत्स्य आहे.
बिडवी
स्फि. जेलो ह्या जातीचे हे मराठी नाव आहे. तो द. भारतातील समुद्रात आढळतो व दोन्ही किनाऱ्यावर त्याची मासेमारी चालते. तो १.५२ मी. पर्यंत लांब असतो. शरीर करड्या रंगाचे असून त्यावर लोंबत्या हारासारखे पट्टे किंवा दोन्ही बाजूंवर उभे पट्टे असतात व खालची बाजू पांढरट असते. श्रोणिपक्ष (कमरेवरील पर) पांढरट असतात व इतर पर पिवळे असून त्यांवर काळे ठिपके असतात. असे ठिपके विशेषतः परांच्या कडांवर असतात. हा मासाही उत्तम खाद्य मत्स्य आहे.