बुर्सा
बुर्सा Bursa | |
तुर्कस्तानमधील शहर | |
बुर्सा | |
देश | तुर्कस्तान |
प्रांत | बुर्सा |
प्रदेश | मार्मारा |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ५२०० |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३०० फूट (९१ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २७,८७,५३९ |
http://www.bursa.bel.tr/ |
बुर्सा (तुर्की: Bursa) हे तुर्कस्तान देशाच्या अनातोलिया भागातील एक प्रमुख शहर आहे. बुर्सा प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेले बुर्सा तुर्कस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बुर्सा तुर्कस्तानच्या पश्चिम भागात इस्तंबूलच्या १५० किमी दक्षिणेस मार्माराच्या समुद्राजवळ वसले आहे. २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे २७.८८ लाख होती.
इ.स. १३३५ ते १३५३ दरम्यान बुर्सा ओस्मानी साम्राज्याच्या राजधानीचे स्थान होते. ओस्मानांचा उदय येथूनच झाल्याचे मानले जाते. ह्या ऐतिहासिक बाबीसाठी बुर्सा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
आजच्या घडीला बुर्सा तुर्कस्तानच्या वाहन उद्योगाचे केंद्र असून येथे अनेक आंतरराष्त्रीय वाहन उत्पादक कंपन्यांचे कारखाने आहेत. ह्याचबरोबर बुर्सा एक लोकप्रिय पर्यटनस्थळ देखील आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील बुर्सा पर्यटन गाईड (इंग्रजी)
- बुर्सा स्की रिसॉर्ट Archived 2016-04-07 at the Wayback Machine.
- बुर्सा महापालिका Archived 2016-01-19 at the Wayback Machine.