Jump to content

बुरुड

बुरुड जातीचे लोक प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, नागपूर जिल्यातील जंगल असलेल्या भागात वास्तव्यास आहेत. या भागातील बुरुड जातीची संस्कृती, रुढी, परंपरा, देव देवता, बोलीभाषा ही मध्ये प्रदेशातील कंडरा जमातीशी साम्य दिसून येते. त्याच्यात रोटीबेटी व्यवहार सुद्धा आजही होतात.त्याचं प्रकारे महाराष्ट्रातील कर्नाटक सीमाभागात असलेले बुरुड व कर्नाटक येथील मेदार जातीशी रोटिबेटी व्यवहार आजही अस्तित्वात आहेत. बांबू व्यवसाय करणाऱ्या कंडरा(मध्यप्रदेश) मेदार मेदा बुरुड (कर्नाटक) या राज्यात अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट आहेत.महाराष्ट्रात कंडरा ही जात अनुसुचित जमातीतर बुरुड ही जात अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रतील बुरुड यांची आडनावे (हिरापूरे, हांडे, गराडे, नागापूरे, मुंडे, कलारे, बोरकर)ही प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात दिसून येतात तर उर्वरित महाराष्ट्रातील आडनावे (सुर्वे, पिंपळे,जोरगेवार, सूर्यवंशी, हळदे, खैरे, हादगे, गेनेवार, मंथंनवार, पटकोटवार, मंचलवार, लिंबाळे, सुलभेवार पवार, नागे, साळुंखे, जगताप) यासारखी दिसून येतात

सेन्सेस रिपोर्ट १९०१ पान नं १९२नुसार बुरुड ही जात आदिवासी असल्याचे दिसून येते आणि भौगोलिक द्रुष्ट्या बुरुड जातीचे बहुसंख्ये लोक हे जंगल ,डोंगराळ भागात राहतात . निरनिराळ्या जंगल भागात बांबू मिळत असल्याने बुरुड जातीचे लोक हे छोट्या छोट्या समूहाने विविध ठिकाणी आढळून येतात आणि हे लोक इतरांपासून वेगळे राहत असल्याने त्यांच्यात वैचारिक देवाणघेवाण दिसून येत नाही हे लोक प्रगत जातीच्या लोकांबरोबर संपर्क संवाद साधायला घाबरतात संकोच बाळगतात हे दिसून येते . सन १९१६ च्या सेन्सेस रिपोर्ट पान न. ५६ नुसार बुरुड जातीचा बांबूपासून विविध वस्तू तयार करणे हे काम अपवित्र अस्वच्छ स्वरूपाचे नाही तर विविध वस्तूंचा उपयोग अनेक शुभकार्यात होत असल्याचे दिसून येतो हा धंधा आदिम आदिवासीना नैसर्गिक रित्या पूरक ठरतो ज्यांना जंगलातून बांबू मिळतो . सन १९२० च्या सेन्सेस रिपोर्ट पान न. १३५-१४२ नुसार बांबू कामगार बुरुड जाती डॉमिनेन्सच्या सर्व भागात वेगवेगळ्या नावाने आढळतात .ज्यामध्ये विविध जमातीचे सदस्य असून त्याच्यात आदिवासी रक्ताचा समावेश आहे (इंडिकेशन ऑफ प्रिमिटिव्हनेस ) सन १९२० च्या सेन्सेस रिपोर्ट पान न. २५५-२५९ आणि १९११ च्या सेन्सेस रिपोर्ट पान न. २४८-३०४ नुसार बुरुड समाजाचा वंशपरंपरेचा वेवसाय हा बांबूपासून सूप टोपली चटई बनवणे आहे. हे बुरुड दक्खन व कर्नाटकाच्या आदीवाशी जमाती पैकी एक आहे. सन १९१६ च्या सेन्सेस रिपोर्ट पान न. २०८-२१२ नुसार बुरुड या जातीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात संस्कृत मध्ये बुरुड तर मध्येप्रदेश, ओडिसा मध्ये उडिया भाषेत कंडरा तर कर्नाटक मध्ये मेदार /मेदा या नावाने संबोधले जाते. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे बुरुड जातीत जन्मलेले संत श्री बाबुराव नागपुरे उर्फ लहरिदास महाराज यांनी कीर्तन भजन यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले त्यांनी समाजातील अंधश्रद्धा वाईट रूढीपरंपरा नष्ट करून मानवतेचा समतेचा संदेश दिला व व्यसनाधीन अशिक्षित समाजाला जागरूक करण्याचे कार्य त्यांनी केले. संत बाबुराव नागपुरे महाराज यांनी संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांचे विचार विदर्भातील अतिदुर्गम भागात गावोगावी पोहचवण्याचे कार्य केले. १९९८-२००० या कालावधीत नागपूर आकाशवाणी केंद्रावरून लोकजागर या कार्यक्रमात हुंडाबळी ,दारूबंदी, महीलासबलीकरण या सारख्या विषयावर विविध भजने सादर केली. संत बाबुरवजी नागपुरे महाराज यांचं संपूर्ण आयुष्य समाज प्रबोधनात गेलं.