बुबुळ
डोळ्यातील पातळ गोलाकार रचनेच्या अवयवाला किंवा मांसगोलकाला बुबुळ (इंग्रजी:Iris, आयरिस) म्हणतात. याचे मुख्य काम डोळ्यातील बाहुलीचा व्यास आणि आकार नियंत्रित करणे आहे. म्हणजेच बुबुळ दृष्टिपटलापर्यंत पोहोचणारा प्रकाश नियंत्रित करते. डोळ्याचा रंग बुबुळावरून निश्चित केला जातो.