Jump to content

बुद्धिक्षमता

‘बुद्धीच्या क्षमता वाढविण्यासाठी प्राचीन संस्कृतवर अधिष्ठित अधयन प्रणालीचा उपयोग’ (मूळ संस्कृत विषयःबुद्धिक्षमतापरिवृद्ध्यर्थम् प्राचीनसंस्कृताधयनप्रणाल्या: उपयोग: |) हे संशोधन संस्कृत भाषेच्या उपयोजिततेवर आधारित आहे.  बुद्धी ही मनुष्याला मिळालेली  एक नैसर्गिक शक्ती आहे. बुद्धीच्या सहाय्याने आपण अध्ययन तसेच इतरही अनेक कार्ये करू शकतो पण त्यासाठी बुद्धी हे साधन कसे वापरावे याचे तंत्र अवगत केले पाहिजे. हे तंत्र ज्ञात नसल्याने विद्ध्यार्थ्याना पुढील समस्यांना सामोरे जावे लागते.

समस्या

  • विषय न समजणे.
  •      लक्षात न राहणे.
  •        तत्त्व व प्रत्यक्ष प्रयोग यांमध्ये ताळमेळ नसणे.
  •        कार्यकारण संबंध न समजणे.
  •      क्रम न लावता येणे.
  •       अतिविचारामुळे चंचलतेमुळे एकाग्रता न साधणे.
  •        खूप वेळ अभ्यास न करता येणे.
  •         इच्छा व कृती यांच्यामध्ये सामंजस्य नसणे.
  •        अध्ययनाची नावड निर्माण होणे.
  •       स्वतः अध्ययन करण्यास असमर्थ असणे.

     वर उल्लेखित समस्याच प्रस्तुत संशोधनाच्या प्रेरक होत.

संस्कृत वाङ्ग्मयातील उपनिषदांमध्ये अध्ययन विषयक आंतरिक प्रक्रियेविषयी मनोवैज्ञानिक सूक्ष्म चिंतन आढळते.  ‘आत्मनः ज्ञानाधिकरणत्वसंपादनम् अध्ययनम् | ’ अर्थात् मूलतः ज्ञानाचे अधिकरण असणाऱ्या आत्म्याचे ते पण म्हणजेच ज्ञानाधिकरणत्व संपादणे म्हणजेच अध्ययन होय. छान्दोग्योपनिषदामध्ये नाम (शब्द) ते विज्ञान ( मनुष्याच्या  बुद्धीत अवस्थित झालेले विशेष ज्ञान) ही आंतरिक शृङ्खला वर्णिलेली आहे. या शृङ्खलेमुळे आपल्याला शब्दाचे श्रवण अथवा वाचन केल्यानंतर संबंधित विषयाच्या ज्ञानाचे आंतरिक टप्पे कळतात. ही आंतरिक प्रक्रिया जितकी दोषरहित असेल तितका ज्ञानाधिगम वेगाने होतो.

 अध्ययनाची आंतरिक शृङ्खला

  • विज्ञान
  • ध्यान
  • चित्त
  • संकल्प
  • मन
  • नाम
  • वाग्  

याच वैज्ञानिक आधारावर भारतीय दर्शनोक्त अध्ययन प्रणाली स्थिर आहे. विशेषतः न्याय, सांख्य ही दर्शने आणि आयुर्वेद या ग्रंथांमध्ये अध्ययनसाधनभूत मन व बुद्धी यांचा ज्ञान व ज्ञानसाधन म्हणून उल्लेख  आलेला आहे.

ज्ञानं बुद्धिः न्यायशास्त्र | (तर्क सं. )

सान्तःकरणा बुद्धि: सर्वं विषयमवगाहते यस्मात्।

तस्मात् त्रिविधं करणं द्वारं द्वाराणि शेषाणि॥ 

विषय  ↔     ज्ञानेंद्रिय   ↔   मन    ↔  अहंकार  ↔  बुद्धी   ↔    आत्मा

बुद्धीच्या क्षमता

  •        ग्रहण क्षमता
  •         धारण क्षमता
  •       स्मरण क्षमता
  •        अतिदेश क्षमता
  •        विश्लेषण क्षमता
  •       वर्गीकरण क्षमता
  •        क्रमानिर्धारण क्षमता
  •       अर्थावगमान क्षमता
  •        उहापोह क्षमता
  •        तात्पर्य निश्चिती  क्षमता
  •        प्रस्तुतीकरण क्षमता
  •        विवदन क्षमता
  •        तर्क क्षमता 

बुद्धीच्या उपरोक्त क्षमता विकसित करून आंतरिक अध्ययन प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी दार्शनिक तत्त्वांचे आलोडन करून संशोधिकेने एक महिना समयावाधीचा  अभ्यासक्रम तयार केला जो श्रवण, प्रमाणयुक्त मनन, अनुवाद याने युक्त होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पाठ्यवर्गात संस्कृत‚ गणित‚ C. A, ‚  अभियंता‚    सूक्ष्मजीवशास्त्र‚ १२ वी‚ टारो कार्ड रीडर, आयुर्वेद  अश्या विद्यार्थी व  प्राध्यापकांचा समावेश होता. प्रस्तुत तंत्र साक्षात बुद्धी शक्तीने संबंधित असल्याने या सर्वांनाच या पाठ्याक्रमामुळे त्यांच्या बुद्धीच्या  क्षमता विकसित होवून आपापल्या विषयात फायदा झाला. तसेच क्षमतांमधील  फरक I. Q. test  द्वारा नोंदविला गेला.  

प्रस्तुत संशोधनाचे निष्कर्ष –

  •        संस्कृत विषय सद्य काळात उपयोजित आहे.   
  •         प्राचीन भारतीय संस्कृत अधिष्ठित अध्ययन पद्धतीने बुद्धीचा विकास होतो.
  •        आधुनिक काळातही ही अध्ययन  प्रणाली अर्थक्रियाकारिणी आहे.
  •         प्राचीन भारतीय अध्ययन प्रणाली मनोवैज्ञानिक आहे.
  •       या पद्धतीने अध्ययन केल्यास अध्ययन विषयक समस्या दूर होतात.
  •        कोणत्याही शाखेचा विद्ध्यार्थी  या प्रणालीने लाभान्वित होवू शकतो.   

प्रा. रेवा हरि कुलकर्णी

संस्कृत विभाग

द.भै.फ. दयानन्द कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर