Jump to content

बुद्ध एर फ्लाइट १०३

बुद्ध एरवेझ दुर्घटना, २०११
अपघातग्रस्त विमानासारखेच दुसरे एक बीचक्रॅफ्ट-डी विमान.
अपघात सारांश
तारीखसप्टेंबर २५, २०११
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ कोटदंडा, नेपाळ
27°37′21″N 85°22′40″E / 27.62250°N 85.37778°E / 27.62250; 85.37778
प्रवासी १९ पैकी १० भारतीय
कर्मचारी
मृत्यू १९
बचावले काही नाही.
विमान प्रकार बीचक्राफ्ट १९००-डी
वाहतूक कंपनी बुद्ध एरवेझ, खाजगी कंपनी.
विमानाचा शेपूटक्रमांकVT-AXV
पासूनकाठमांडू,नेपाळ
शेवटकाठमांडू, नेपाळ

सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सकाळी बुद्ध एरवेझच्या बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानाला फ्लाइट क्रमांक बीएचए १०३ च्या दरम्यान अपघात झाला. विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोटदंडा येथे कोसळले. त्यात १० भारतीयांसह एकूण १९ प्रवासी मृत्युमुखी पडले. इतर ९ प्रवाशांपैकी २ अमेरिकन, एक जपानी व ६ नेपाळी प्रवासी होते. यात चालकदलातील सर्व म्हणजे ३ही जणांचा मृत्यू झाला.

नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर, त्यातील पर्यटकांना माउंट एव्हरेस्ट दाखविल्यावर ते विमान काठमांडू येथे परतत असतांना हा अपघात झाला. विमान कोटदंडाच्या पर्वतशिखरास धडकले असा प्राथमिक अंदाज आहे.

विमान

बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानास दोन इंजिने व पंखे असतात व त्याची क्षमता १९ असते. अपघातग्रस्त विमान १३ वर्षे जुने आणि ९एन-एईके या क्रमांकाचे होते.

मृतांची नावे

अ.क्र.नावराष्ट्रीयत्व
कॅप्टन जनबुद्ध ताम्राकारनेपाळ नेपाळी
सहचालक पद्मा अधिकारीनेपाळ नेपाळी
परिचारिका अस्मिता श्रेष्ठनेपाळ नेपाळी
शारदा कर्माचार्यनेपाळ नेपाळी
जगजन कर्माचार्यनेपाळ नेपाळी
निरंजन कर्माचार्यनेपाळ नेपाळी
पंकज मेहताभारत भारतीय
छाया मेहताभारत भारतीय
एम मरुथचालमभारत भारतीय
१०एम मनिमरनभारत भारतीय
११एके क्रिसुननभारत भारतीय
१२भीएम कान्कासावेसनभारत भारतीय
१३टी धनशेकरनभारत भारतीय
१४कत्तुर महालिङगमभारत भारतीय
१५मिनाक्षी सुंदरमभारत भारतीय
१६के त्यागराजनभारत भारतीय
१७ॲन्ड्र्यू वाडेअमेरिका अमेरिकन
१८नेटली नेलनअमेरिका अमेरिकन
१९उजिमा तोसिनोरीजपान जपानी