Jump to content

बुजगावणे

बुजगावणे

बुजगावणे म्हणजे शेतातील पिकांचे पाखरांपासून रक्षण करण्यास तयार करण्यात आलेली मानवनिर्मित एक पुतळासदृश्य वस्तू आहे. याचा उपयोग पक्ष्यांना 'भीती' (घाबरविणे) दाखविण्यास होतो. पक्ष्यांचा असा समज होतो की कोणी व्यक्ती उभी आहे म्हणून ते पिकांचे नुकसान करीत नाहीत.सहसा बास किंवा काड्यांचे 'अधिक' (+) असे चिन्ह तयार करून त्यास शर्ट/अंगरखा घातला जातो.छोट्या मडक्यास ओल्या चुन्याने डोळे,नाकतोंड रंगविले जाते व ते वरच्या टोकास उपडे घालण्यात येते.तयार झालेल्या अश्या बुजगावण्यास मग पिकांमध्ये रोवण्यात येते.

मराठी साहित्यात 'बुजगावणे' हा शब्द 'भीती दाखविणे' अश्या अर्थाने योजिल्या जातो.