Jump to content

बीवायके वाणिज्य महाविद्यालय

'गोखले एज्युकेशन सोसायटी', नाशिक द्वारा संचलित हे उत्तर महासराष्ट्रातील एक अग्रगण्य वाणिज्य महाविद्यालय असून पुणे विद्यापीठातील बीएमसीसी नंतरचे सर्वात मोठे वाणिज्य महाविद्यालय आहे. १९५७ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयला सिन्नरचे प्रसिद्ध उद्योगपती श्रीमान भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या नावे देणगी मिळाल्याने महाविद्यालयाचे नामकरण बीवायके (सिन्नर) वाणिज्य महाविद्यालय (किंवा भियक्ष वाणिज्य महाविद्यालय) असे झाले.

महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला कायमस्वरूपी संलग्न असून त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाची २ (एफ) आणि १२ (बी) मान्यता सुद्धा मिळाली आहे. महाविद्यायाला नॅक कडून सलग दोनदा अ श्रेणी मिळाली असून आयएसओ ९००१:२००८ हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रही मिळालेले आहे.

बीवायके महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ते एकमेव महाविद्यालय आहे जिथे पदवी स्तरावर महाविद्यालयाला स्वायत्तता मिळालेली आहे. बी.कॉम आणि एम.कॉम सोबतच महाविद्यालयात बीबीए, बीबीए (आयबी) आणि बीबीए (सीए) हे व्यावसायिक अभ्यासक्रम चालवले जातात.