बीबीव्ही१५२
vaccine against COVID-19 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | कोविड-१९ लस, inactivated vaccine | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
उत्पादक | |||
विकसक | |||
| |||
बीबीव्ही१५२ (कोवॅक्सिन) एक निष्क्रिय विषाणू-आधारित कोविड-१९ लस आहे. ही लस भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने तयार केली आहे. ही २-डोस लसीकरण पद्धत आहे जी २८ दिवसांच्या अंतराने दिली जाते. आणि २-८ C तापमानावर स्थिर, लहान काचेच्या बाटलीमध्ये द्रव रूपात वापरतात.
निर्मिती
कोवॅक्सिन ही पोलिओ लसीसारखे लस बनवण्याचा पारंपरिक पद्धतीचा वापर करून तयार करण्यात आली आहे. ही लस विषाणूला निष्क्रिय करून बनवतात. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने NIV कोरोना विषाणूचे काही नमुने घेऊन विषाणूची कृत्रिम पैदास केली आणि बीटा प्रोपिओलॅक्टोन (beta-propiolactone) मदतीने त्याची जनुकीय संरचनेत बदल करून त्यांना निष्क्रिय करण्यात आले. परिणामी निष्क्रिय विषाणू नंतर अल्हायड्रॉक्सिकिम-II मध्ये मिसळले जातात. लसीची निर्मिती भारत बायोटेकच्या हैदेराबाद येथिल इन-हाऊस व्हेरो सेल मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म मध्ये केली जाते. ज्याची क्षमता सुमारे ३०० दशलक्ष डोस देण्याची क्षमता आहे. कंपनीने त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत
वैद्यकीय परिक्षण
प्रथम प्राण्यांवर केलेल्या चाचण्या मध्ये ही लस प्रभावी असून प्रतिकारशक्ती तयार करत असल्याचे दिसून आले. जुलै २०२० मध्ये DCGI कडून या लसीच्या प्रथम व दुसऱ्या चरणातील मानवी परिक्षणाला परवानगी देण्यात आली. एकूण ३७५ जणांनी पहिल्या चरणासाठी नोंदणी केली होती. कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया होत नसल्याचा एक मजबुत माहिती संच तयार करण्यात आला, आणि प्रतिपिंड तयार होत असल्याचे ही दिसून आले. जे काही दुष्परिणाम दिसून आले ते फक्त एकूण लस घेतलेल्यापैकी १५% जणांत आढळले.
दुसऱ्या चारणातील परिक्षणासाठी १२-६५ वयोगटातील ३८० लोकांनी नोंदणी केली होती.सामान्य सुरक्षा बाबींसह या परिक्षणांतून रोग प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे दिसून आले.
१८ वर्ष वयोगट वरील लोकांसाठी या लसीचा प्रभाव तपासण्यासाठी पंचवीस हजार आठशे लोकांमध्ये याचे परीक्षण करण्यात आले यापैकी दोन हजार चारशे पेक्षा जास्त लोक हे 60 वर्षावरील आणि साडेचार हजार पेक्षा जास्त लोक हे इतर अन्य आजारांनी ग्रस्त होते. ही लस लक्षणे आढळुन आलेल्या रुग्णावर ७७.८% प्रभावी आहे. तर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर ९३.४% प्रभावी असून कोणतेही लक्षण नसल्यास हिचा प्रभाव हा ६३.७% दिसुन आला. १२% लोकांवर सामान्य परिणाम दिसून आले तर ०.०५% लोकांवर गंभीर परिणाम दिसले. ही लस कोरोनाच्या विविध प्रकारच्या विषणुवर प्रभावी असल्याचे दिसून आले. अल्फा, झीटा, कप्पा, डेल्टा, बीटा यावर ही प्रभावी आहे. कारोनाच्या डेल्टा (B.1.6.17.2) या प्रकारावर ही ६२.५% प्रभावी आहे
वापरण्यासाठी मंजूरी
६ डिसेंबर २०२० रोजी, भारत बायोटेकने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज केला, तत्काळ वापरासाठी मंजूरी मागितली. अशा तरतुदीनुसार अर्ज करणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि फायझर नंतरची ही तिसरी कंपनी होती.२ जानेवारी २०२१ रोजी, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने परवानगी देण्यास शिफारस केली, जी दुसऱ्या दिवशी मंजूर करण्यात आली.ही तत्काळ मंजूरी, तिसऱ्या चारणातील डेटाचा विचार न करता मंजूर केल्याने, व्यापक टीका झाली. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर वापरण्यासाठी मान्यता मिळाली.