Jump to content

बीजिंग सबवे

बीजिंग सबवे
मालकी हक्क बीजिंग महानगरपालिका
स्थानबीजिंग, चीन
वाहतूक प्रकारजलद परिवहन
मार्ग २३
मार्ग लांबी ७२७ कि.मी.
एकुण स्थानके ४२८
दैनंदिन प्रवासी संख्या १.०५ कोटी (२०१८ सरासरी)
सेवेस आरंभ १५ जानेवारी १९७१
मार्ग नकाशा

बीजिंग सबवे (चिनी: 北京地铁) ही चीन देशाची राजधानी बीजिंग ह्या शहरामधील एक उपनगरी रेल्वे व जलद वाहतूक सेवा आहे. एकूण ७२७ किमी लांबीचे जाळे असलेल्या बीजिंग सबवेमध्ये एकूण २४ मार्गिका तर ४२८ स्थानके आहेत. बीजिंग महानगरामधील १२ जिल्हे तसेच शेजारील हपै प्रांतामधील लांगफेंग ह्या शहरास वाहतूक पुरवणारी बीजिंग सबवे ही जगामधील सर्वाधिक वर्दळीची नागरी परिवहन सेवा आहे. २०१९ साली बीजिंग सबवेवरील दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे १ कोटी तर वार्षिक प्रवासी संख्या ३८४ कोटी इतकी होती.

बीजिंग सबवे प्रणालीमध्ये १९ जलद परिवहन मार्ग, २ विमानतळ जोडमार्ग, १ मॅग्लेव्ह मार्ग तर २ हलके रेल्वेमार्ग आहेत. बीजिंग महानगरामधील बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन्ही विमानतळ तसेच सर्व प्रमुख लांब पल्ल्याची रेल्वे स्थानके बीजिंग सबवे मार्गावर आहेत

टीपा

बाह्य दुवे