Jump to content

बीजगर्भ परीक्षण

काही झाडांच्या बियाण्यामध्ये बी काढल्यानंतर बी रुजवणीकरता बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे अशा बियान्याचे बीजपरीक्षण कठीण होऊन बसते. अशा वेळी आतला बीजगर्भ (Embryo) काढून त्याचे परीक्षण केले जाते. जर तो बीजगर्भ जननरूप असेल टीआर तो रूजन्याची प्रतीक्रिया दाखवतो. अन्यथा त्याचा रंग बदलतो. बीजगर्भ बियाण्यातून खूप काळजीपूर्वक काढला पाहिजे. नाहीतर बीजगर्भाला धक्का लागून त्याच्या रुजण्यात अडथळा येईल. ज्या बियांचे कवच टणक व घट्ट असते ते फोडून त्यातून बीजगर्भ अलग करावा. कठीण बीजकवच धारदार तीक्ष्ण पात्याच्या चाकूने कापून काढावे. त्यानंतर बीजगर्भ रूजव्ण्याच्या पद्धती नेहमीच्या बियाणे रूजवण्याप्रमाणेच असतात.