बी. विजयालक्ष्मी
बी. विजयालक्ष्मी या नव्या पीढीच्या संशोधिका होत. (मृत्यु : मे १२ इ.स. १९८५). तिरुचिरापल्ली येथे एम.एस्सी. केले चेन्नई येथे पदार्थविज्ञानाच्या शाखेत संशोधन. सामाजिक भान असलेली शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध.
प्रमुख संशोधन
एकेरी भार असणारे कण आणि त्यांचे भ्रमण याविषयीची समीकरणे ज्ञात होती. बी. विजयालक्ष्मी यांनी सापेक्ष समीकरणाचे याव्यतिरिक्त मोठे समूह दाखवून दिले.
- भारविरहित कण आणि विद्युत चुंबकीय क्षेत्रातील ध्रुवीकरण यांचे परस्पर अवलंबित्व उलगडून दाखविणारा हा प्रबंध प्रसिद्ध केला.
- पीएच.डी.साठी वातावरणबाह्य चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षणीय क्षेत्र यातील तीव्रगती भ्रमणलहरींच्या समीकरणावर पाच प्रबंध लिहून विद्यापीठाला सादर केले.