बिलासपूर विमानतळ
बिलासपूर विमानतळ चकरभाटा विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: PAB – आप्रविको: VABI | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | बिलासपूर,छत्तीसगढ | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ८९९ फू / २७४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 21°59′18″N 082°06′40″E / 21.98833°N 82.11111°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१७/३५ | ५,०३५ | १,५३५ | डांबरी धावपट्टी |
बिलासपूर विमानतळ (आहसंवि: PAB, आप्रविको: VABI) हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते चकरभाटा या ठिकाणी, बिलासपूरपासुन सुमारे १० कि.मी. अंतरावर आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे सध्या याची मालकी याचा उपयोग वैमानिक प्रशिक्षण व खाजगी विमानांसाठी होतो.[१]
असून भारतीय सेनेला याची मालकी हवी आहे. तेथे विशेष दलांसाठी सुविधा तयार करण्याचा त्यांचा बेत आहे.[२][३] सेनेला सगळा विमानतळ हवा आहे तर विमानतळ प्राधिकरणाने त्यातील ३७ एकर जागा नागरी उड्डाणांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.[४]
बाह्य दुवे
- विमानतळ माहिती VABI वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Sai Flytech Aviation Academy". 25 January 2012 रोजी पाहिले.
- ^ "Helicopters recalled from UN duty to combat Naxals". 26 July 2010. 26 January 2012 रोजी पाहिले.
- ^ Dholabhai, Nishit (5 August 2010). "Special forces school shift". Calcutta, India. 26 January 2012 रोजी पाहिले.
- ^ "AAI has a list of grouses with Army". 18 September 2010. 2018-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2012 रोजी पाहिले.