बिरजू महाराज
कथक नर्तक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | बिरजू महाराज | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी ४, इ.स. १९३८ लखनौ | ||
मृत्यू तारीख | जानेवारी १६, इ.स. २०२२ दिल्ली | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखले जाणारे ब्रिजमोहन मिश्रा, (४ फेब्रुवारी १९३८, १७ जानेवारी २०२२, दिल्ली[१]), हे कथक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक होते.[२] ते कथक नर्तकांच्या महाराज घराण्यातील वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज आणि त्यांचे वडील आणि गुरू, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि गायकसुद्धा होते.
वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली.भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कथ्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य/नाट्य संस्था सुरू केली .
शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
संदर्भ
- ^ "Pandit Birju Maharaj, Legendary Kathak Dancer, Dies At 83". NDTV.com. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "जानें- कत्थक सम्राट बिरजू महाराज के बारें में ये खास बातें." ४ फेब्रुवारी २०१८.