बिरगुंडवाडी
?बिरगुंडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | इंदापूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
लोकसंख्या | ८९२ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | मराठी |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२११८ • एमएच/MH 42 |
बिरगुंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
वालचंदनगर भिगवण रोडवरील कळस जवळील हजारं लोकवस्तीचे गाव
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
१२०० हेक्टर शेतजमीन आहे यामध्ये 300 हेक्टरवर वनक्षेत्र आहे शेती हाच मुख्य व्यवसाय आहे, द्राक्षे, डाळिंब फळबागा आहेत, शेततळी, ठिंबक सिंचन करण्यात आले आहे, पारंपारिक रूढी परंपरा कायम असून धार्मिक कार्यक्रमात सर्व गावकरी सहभागी होतात
प्रेक्षणीय स्थळे
बिरंगुडी ता इंदापूर येथे बिरंगाई देवीचे भव्यदिव्य मंदिर आहे याठिकाणी आषाढी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते नवसाला पावणारी देवी अशी या ठिकाणची ख्याती आहे
नागरी सुविधा
स्वतंत्र महसुली गाव आहे, वाडीत जाणेसाठी पक्का डांबरी रस्ता आहे, चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे , व्यायाम शाळा आहे
जवळपासची गावे
बारामती २५ किमी, वालचंनगर १० किमी, भिगवण १५ किमी, इंदापूर ३० किमी,