बिमल रॉय
बिमल रॉय (जुलै १२, इ.स. १९०९ – जानेवारी ७, इ.स. १९६६) हे हिंदी सिने सृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक होते. इ.स. १९५५ साली त्यांचा देवदास हा चित्रपट खुपच गाजला होता. रोंय यांचा जन्म ढाका, पूर्व बंगाल, आता बांगलादेश. त्यांच्या मधुमती चित्रपटाने १९५८ मध्ये ९ फिल्मफेर पुरस्कार जिंकले, हा एक ३७ वर्षांपर्यंत विक्रम होता.