बिजू पटनायक विमानतळ
बिजू पटनायक विमानतळ भुवनेश्वर विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: BBI – आप्रविको: VEBS | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | भुवनेश्वर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १३८ फू / ४२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 20°14′40″N 085°49′04″E / 20.24444°N 85.81778°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०५/२३ | ४,५२४ | १,३७९ | डांबरी धावपट्टी |
१४/३२ | ७,३५९ | २,२४३ | डांबरी धावपट्टी |
बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBI, आप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा
ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. [१]. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी२) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे.
या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात.
भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी)
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
इंडियन एअरलाइन्स | चेन्नई, दिल्ली, मुंबई |
इंडिगो एअरलाइन्स | दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद |
जेटलाईट | दिल्ली, कोलकाता |
किंगफिशर एअरलाइन्स | दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता |
संदर्भ
बाह्य दुवे
- बिजू पटनायक विमानतळ Archived 2010-03-18 at the Wayback Machine. (भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर))
- विमानतळ माहिती VEBS वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.