बासे
?बासे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
बासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
बासे हे गांव महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे.हे गांव मुंबई शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे.
महत्त्व
गांवापासून ५-६ कि.मी. अंतरावर वज्रेश्वरी, गणेशपुरी व अकलोली ही धार्मिक स्थळे, माहुलीगड हे ऐतिहासिक किल्ला असलेले ठिकाण आहे.याच माहूली गडाच्या पायथ्याशी असलेलया टेकडीवर नंदीकेश्वराचे पुरातन मंदिर आहे. तसेच तानसा तलाव व तेथील अभयारण्य ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.गांवात पुरातन हनुमान मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार सन २००७ साली करण्यात आला.
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.