बासर
बासर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठाजवळ वसलेले एक गाव आहे. या गावात सरस्वतीची वालुकामय मूर्ती असलेले मंदिर आहे. बासर रेल्वे स्टेशनापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर व्यास सरोवराच्या काठावर हे पुरातन मंदिर आहे. जवळच व्यासांचेही मंदिर आहे. या सरस्वतीसमोर, मुलांना शाळेत घालण्यापूर्वी आणि शिक्षणास सुरुवात करण्यापूर्वी, पाटी पुजण्याची पद्धत आहे.
जवळच 'वेदवती' नावाची एक शिळा आहे. या शिळेवर आघात केल्यास चारही बाजूंनी चार वेगवेगळ्या प्रकारांचे ध्वनी निघतात.