Jump to content

बावा बूद्या

बावा बूद्या (मराठी नामभेद: बावाबुद्धया) हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. बावा म्हणजे डोक्यावर बांबूपासून तयार केलेले टोपी असते. अंगावर पांढऱ्या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती दुधीभोपळ्यासारखी फळे बांधलेली असतात. हातात तलवार वा लाकडी बांबूची काठी असते. कंबरेला व पायात घुंगरू बांधलेले असतात. हे घुंगरांच्या ठेक्यावर किंवा डोलाच्या ठेक्यावर नाचतात. एकतालात नाचणे व घुंगरांचा आवाज यामुळे या बावाबुद्धयांचे नृत्य पाहण्यासारखे असते.

बूद्या म्हणजे डोक्यावर मोराची पिसे यांपासून बनवलेली टोपी.